Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

बेनोडा येथील भाजपा महिला आघाडीने केली वीजबिलाची होळी

वरुड :कोवीड-१९ कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने जाहीर लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात व्यापार-उद्योग पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. सध्याच्या स्थितीमुळे सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली असून या काळातील म्हणजेच मार्च, एप्रिल व मे ह्या तीन महिन्याच्या काळातील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीने अव्वास्तव आकारण्यात आलेल्या वीज बिलाना माफी देण्यात यावे याकरिता बेनोडा येथील भारतीय जनता महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महावितरण कार्यालयासमोर वीजबिलाची होळी करून निदर्शने करण्यात आले. कोरोनामुळे 3 महिन्यांपासून टाळेबंदी होती. कोरोना टाळेबंदीमुळे अनेकांना वेतनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या तीन महिन्यांत घरगुती ग्राहकांना सरासरी बिले पाठविण्यात आली. गेल्या तीन महिन्यांची सरसकट आणि वाढीव वीजबिले पाठवल्याने सर्वसामान्य नागरिक प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनता महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आंदोलन छेडले. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अशात एकदम तीन महिन्यांची विजबिले आल्यामुळे ती एकरकमी भरण्याच्या समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. वीजबिलाच्या विरोधात बेनोडा येथील महावितरण कार्यालयासमोर भारतीय जनता महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी व आंदोलन करून वीजबिलाची होळी करण्यात आली. यावेळी बेनोडा येथील भाजपा महिला आघाडीच्या शाखा अध्यक्षा सौ विद्या भुंबर, नंदा फरकाडे, अर्चना गोहाड, रसिका चिंचमलातपुरे, अर्चना फरकाडे यांच्यासह पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Comment