Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

आमदार रवी राणा यांचा शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा अनोखा प्रयत्न

आदिवासी बहुल मेळघाटात जाऊन केली पेरणी,मेलघाटशी आपले अतुट नाते असल्याचे केले सिद्ध,शेतकरी -शेतमजूर यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणार,,शेतकरी-शेतमजुरांवर अन्याय होऊ देणार नाही-आमदार रवी राणा धारणी-मृग नक्षत्र संपताच शेतकऱ्यांची पेरण्याची लगबग सुरू होते,मृगाचा पाऊस पडल्यानंतर पेरते व्हा पेरते व्हा चा नारा देत बळीराजा आपल्या कुटुंबकाफ़िल्यासह आपल्या शेत-शिवार-वावरात निघतात.शेतकरी पुत्र असलेले व शेतकरी शेतमजुरासाठी दोन वेळा जेल ची वारी केलेले शेतकरी शेतमजुरांचे कैवारी आमदार रवी राणा यांनी आदिवासी बंधु व भगिनींचे मनोबल वाढविणे ,त्यांच्या समस्या जाणून घेणे ,त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांचे मनोबल वाढविणे यासाठी काळ्या आईशी इमान राखून त्यांच्याच धर्तीवर जाऊन आदिवासी समवेत पेरणी करून आमदार रवी राणा यांनी आपली मेलघाटशी असणारे घट्ट नाते सिद्ध केले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा 7/12 कोरा करण्यात यावा व कर्जाचे पुनर्गठन करून बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी तंबी त्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली आदिवासींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्रास देऊ नये,शासनाने त्यानां बियाणे ,खत,युरिया व कीटकनाशके आदी त्यांचे बांधावर उपलब्ध करून द्यावी, खावटी योजनेअंतर्गत त्यांना अनुदान व सानुग्रह मदत घ्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली.बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्यांना माफ करणार नाही असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. शेतकरी हा स्वाभिमानी असतो व घाम गाळून इमानदारीने जगतो,बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे त्याचा सन्मान झालाच पाहिजे व त्याला सदैव सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे यासाठो आपण सदर पेरणे करीत असल्याचे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी केलं.आपण काळ्या मातीचे पुत्र असून काळ्या आईची सेवा आजन्म करीत राहू असे प्रतिपादन आमदार रवी राणा यांनी पेरणी करते वेळी केले.

Leave A Comment