Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

नगरपालिकेने कोणतेही कर न घेण्याचे निर्देश शासनाने द्यावे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागासोबत नगरपालिका लहान दुकानदार, व्यावसायिक यांचा उत्पन्नाचा स्त्रोत सातत्याने तीन महिने बंद होता. त्यातच ३१ मार्च २०२० पर्यंतचे घरटेक्स, मालमत्ताकर, पाणीपट्टी, स्वच्छताकर, शैक्षणिक कर, याचे भरण्याबद्दल नगर पालीकामधून नोटीसेस यायला लागल्या परंतु आर्थिक स्थिती लक्षात घेऊन नागरिकांना हा मागील वर्षाचा टेक्स भरणे शक्य झाले नाही. हा कर भरला नाही म्हणून नगर पालिकेने या कराच्या रक्कमेवर व्याज लावणे सुरु केले आहे. असे व्याज लावणे या कोरोनाच्या काळात नागरिकांना शिक्षा करण्यासारखे आहे. करिता पंचायतला मालमत्ता करावर कोणतेही व्याज आकारणी करू नये असे स्पष्ट निर्देश शासनाने द्यावे. तसेच एप्रिल ते जून २०२० पर्यंत लॉकडाऊनच्या काळामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यामुळे या काळातील नगरपालिकेचा घरावरील कर, मालमत्ताकर, पाणीपट्टी, स्वच्छताकर, नागरिकांना माफ करण्यात यावे व शासनाने नगरपालिकेला अनुदान रुपात या करांचा परतावा द्यावा अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

Leave A Comment