Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

संशयित रुग्णाचा तपशील खासगी डॉक्टरांकडून मिळणे आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती: अनेकदा खासगी रुग्णालयात रुग्णामध्ये लक्षणे आढळल्यास शासकीय दवाखान्यात स्वॅबसाठी जाण्याची सूचना दिली जाते. मात्र, त्यानंतरही काही ठिकाणी रुग्ण शासकीय दवाखान्यात तपासणीसाठी येत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्यावी व समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिले आहेत. महापालिकेचे आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपल्या स्तरावर सर्व खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना संशयित रुग्ण आढळल्यास तत्काळ माहिती देण्याबाबत सूचित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. खासगी डॉक्टरांकडून संशयित रुग्णांचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता आदी तपशील रोज मिळणे आवश्यक आहे. असा तपशील प्राप्त होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसेच तालुका आरोग्य अधिका-यांनी संबंधित रुग्णाशी संपर्क साधून वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हा आरोग्य अधिका-यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. व्यापक जनजागृती मोहिम राबवावी कोरोना प्रतिबंध दक्षता नियमांचे पालन सर्वांकडून होणे अपेक्षित आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, महापालिका, इतर स्थानिक स्वराज्य संस्था व विविध विभागांनी 26 ते 28 जून दरम्यान जनजागृती मोहिम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले आहेत. कुणीही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स पाळावे व सॅनिटायझर, साबणाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक जनजागृती मोहिम राबविण्याचे निर्देश आहेत. बाहेरून येणा-या प्रवाश्यांचे स्वॅब घेणार पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अकोला व इतर हाय रिस्क जिल्ह्यांतून अमरावती जिल्ह्यात येणा-या प्रवाश्यांच्या वैद्यकीय तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणा-या प्रवाश्यांचे सात दिवस विलगीकरण करुन त्यानंर थ्रोट स्वॅब घेण्यात यावे, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांना देण्यात आले आहेत.

Leave A Comment