Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी केली बडनेरा ची पाहणी

अमरावती आज बुधवार दिनांक 24 जुन,2020 रोजी मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी बडनेरा येथील जयस्‍तंभ चौकाची पाहणी केली. पाहणी दरम्‍यान नगरसेवक प्रकाश बनसोड, नगरसेवक ललीत झंझाळ, माजी सभापती स्‍थायी समिती जावेद मेमन, सहाय्यक आयुक्‍त विशाखा मोटघरे, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंन्‍द्रे, जावेद कादरी उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश बनसोड, ललीत झंझाळ, इम्रान अब्‍दुल सईद, मोहम्‍मद साबीर, नगरसेविका इशरतबानो मन्‍नान खॉ, गंगाताई अंभोरे, रुबिना तब्‍बस्‍सुम हारुण अली, माजी सभापती स्‍थायी समिती पापे ठाकुर, माजी सभापती स्‍थायी समिती जावेद मेमन यांनी बडनेरामध्‍ये जनता कर्फ्यु लावावा अशी मागणी दिनांक 17 जुन,2020 रोजी महापौर, जिल्‍हाधिकारी, मनपा आयुक्‍त यांच्‍याकडे करण्‍यात आली होती. शनिवार दिनांक 20 जुन,2020 रोजी सायंकाळी 5 वाजतापासुन बडनेरा भागात स्‍वयंमस्‍फुर्तीने जनता कर्फ्यु पाळण्‍यात आला. 25 तारखेपासुन पी-1 व पी-2 नुसार पुन्‍हा बाजार उघडण्‍यात येणार आहे. चारही दिवस बडनेरा वासियांनी कडक संयम पाळून जनता कर्फ्यु यशस्‍वी केला असल्‍याने येथील नागरिकांचे व स्‍थानिक नगरसेवकांचे अमरावती महानगरपालिका प्रशासन व महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे यांनी विशेष कौतुक केले आहे. बडनेरा भागातील जुनी-नवी वस्‍तीसह अनेक भागात कोरोनाचे रुग्‍ण सापडण्‍याचे सत्रच सुरु झाल्‍याने नागरिकांनी कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्‍यासाठी पुढाकार घेत या 4 दिवसीय कडक जनता कर्फ्युची हाक दिली होती. बडनेरा येथील नगरसेवक, व्‍यापारी व नागरिकांच्‍या पुढाकारातून घेण्‍यात आलेल्‍या या निर्णयाला जिल्‍हाधिकारी व मनपा आयुक्‍तांनी विविध प्रतिबंधात्‍मक उपायोजनाही केल्‍या. संपुर्ण बडनेरा शहर निर्जंतुक करुन नागरिकांची आरोग्‍य तपासणी सुरु करण्‍यात आली. या दरम्‍यान नागरिकांनी 4 दिवस कडक जनता कर्फ्युचे पालन केले. 24 जुन हा जनता कर्फ्युचा शेवटचा दिवस असून 25 जुन पासुन बडनेरा भागातील दुकाने पुन्‍हा पी-1 व पी-2 नुसार उघडल्‍या जाणार आहे.

Leave A Comment