Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

पावसाळ्यात उपाययोजनांसाठी आ. सुलभाताई खोडके यांचा पुढाकार

अमरावती १४ जून : एकीकडे शहरात काँक्रिटरस्त्यांचे जाळे निर्माण होत असतांना दुसरीकडे मात्र रहिवाशी क्षेत्रातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली दिसून येते . अमरावतीत नव्याने विकसित होणाऱ्या रहिवासी क्षेत्रात पक्के रस्ते नसल्याने या भागात पावसाळ्यात पाणी व चिखल साचत असल्याने स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो . या भागातील कच्या रस्त्यांवर जागोजागी गड्डे पडले असल्याने ऐन पावसाळ्यात या रस्त्यांवर पाण्याचे तळे साचून अवागमनाची समस्या निर्माण झाली आहे . परिणामी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही . दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे याची प्रचिती सुद्धा बघायला मिळाली . त्यामुळे पावसाचे दिवसात रस्त्यांवर कुठलीही समस्या निर्माण होऊ नये , यासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी उपाययोजनांना घेऊन पाऊले उचलली आहे . अमरावती मधील कच्या रस्त्यांवर मुरूम टाकून तेथे अवागमनाची सुरक्षित व्यवस्था करण्याची सूचना आमदार सुलभाताई खोडके यांनी अमरावती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना केली आहे . अमरावती मतदार संघातील विविध ठिकाणच्या कच्या रस्त्यांवर मुरूम टाकण्याला घेऊन जवळपास १०० ट्रक मुरूम उपलब्ध करण्याबाबत आ. सुलभाताईंनी मनपा आयुक्तांना पत्राद्वारे कळविले आले. यावर मनपा आयुक्तांनी सुद्धा ज्या भागात मुरूम टाकायचा आहे ,तेथील स्थानिक व्यक्तीला संपर्क करून कनिष्ठ अभियंत्याद्वारे रस्त्यांवर मुरूम टाकून तेथे सुरक्षित अवागमनाची व्यवस्था करणार असल्याचे आ. सुलभाताई खोडके यांना सांगितले आहे .

Leave A Comment