Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

विविध न्यायालयांचे काम दोन सत्रांत

अमरावती, दि. 10 : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली व  जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये दोन सत्रांमध्ये सुरू करण्यात आली आहेत. त्यानुसार दररोज सुनावणीसाठी येणा-या प्रकरणांतील अंतिम सुनावणी, आदेश आदी तातडीची प्रकरणे चालविण्यात येतील.  ज्या प्रकरणांत साक्ष नोंदविणे आवश्यक आहे, त्यांची सुनावणी शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येईल जेणेकरून न्यायालयांत होणारी गर्दी टाळण्यास मदत होईल, अशी माहिती जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रबंधक रवींद्र कांबे यांनी दिली. यासाठी सर्व अधिवक्त्यांना दररोज सुनावणीसाठी येणा-या प्रकरणाची यादी संबंधित दिनांकाच्या दोन दिवस आधी पुरविण्यात येणार आहे. त्यानुसार न्यायालयातर्फे निर्गमित दिनांक 5 जूनच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशांचे सर्व संबंधितांना पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Comment