Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

प्रशासनाशी संबंधित सूचना, तक्रारी संवाद पोर्टलला नोंदवा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आवाहन

अमरावती, दि. 13 :  जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांशी संबधित सूचना, तक्रारी, अडचणी संवाद पोर्टलला नोंदवाव्यात. कोरोना संकटकाळात कार्यालयांत गर्दी टाळण्यासाठी ई- संवाद उपक्रमातील पोर्टल किंवा टोल फ्री क्रमांकाचा अधिकाधिक वापर नागरिकांनी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून गतिमान प्रशासन व पारदर्शकता निर्माण करण्याच्या हेतूने अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे ई-संवाद या विशेष उपक्रमाचा शुभारंभ दि. 1 जानेवारी 2020 रोजी झाला. नागरिकांना आपल्या सूचना, अडचणी नोंदविण्यासाठी संवाद हे पोर्टल, टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आले व सेंट्रल कॉल सेंटर म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद कक्ष निर्माण करण्यात आला. नागरिकांच्या समस्या व अडचणींचे वेळेत निराकरण व्हावे, त्यांना कार्यालयात येण्याची गरज भासू नये व त्यांचा प्रवास खर्च, वेळ वाचावा या हेतूने उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी होत आहे. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद वाढणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपायांची अंमलबजावणी होत असताना अर्थचक्राला गती देण्यासाठी लॉकडाऊनमध्ये मोकळीक देण्यात आली आहे. मात्र, या काळात दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. गर्दी व प्रवास शक्यतो टाळावा. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाशी संबंधित कुठल्याही सूचना, तक्रारी, अडचणी असतील तर www.sanvad.in या पोर्टलला नोंदवाव्यात किंवा 1800 233 6396 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले.    संवाद कक्षात नोंदी घेऊन संबंधितांकडे पाठपुरावा करणे, सूचनाकर्ता व अधिकारी यांच्यात समन्वय ठेवणे यासाठी स्वतंत्र कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली आहे, तसेच अद्यापपर्यंत सुमारे पाचशे तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. गतिमान सेवा, जलद तक्रार निवारण, पारदर्शकता यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला आपले म्हणणे, अडचणी मांडण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज पडू नये व त्याला घरबसल्या निवेदन पाठवता यावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे , अशी माहिती संवाद कक्षातर्फे देण्यात आली.

Leave A Comment