Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमण १२,६७४,५४३ डिस्चर्ज ७,४०२,५९१ मौत ५६३,९१० |
  • भारत कोरोना संक्रमण ८,३०,७६३ इलाज शुरु २,८५,४९७ डिस्चार्ज ५,२२,६३१ मौत २२,२५६ |
  • अमरावती में ९१४ पॉजिटिव | डिस्चार्ज ६१९ | मौत ३२
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमण २,३८,४६१ इलाज शुरु ९५,६४७ डिस्चार्ज १,३२,६२५ मौत ९,८९३ |

 पंतप्रधान रोजगार, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

अमरावती, दि. 9 : जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळाकडून पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम या योजनेत 2020-21 या वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सं. धा. बांगर यांनी केले आहे. शहरी व ग्रामीण भागात नवा उद्योग किंवा सेवा सुरू करू इच्छिणा-या सुशिक्षित बेरोजगार तरूण- तरूणींसाठी हा कार्यक्रम आहे. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तींना प्रकल्प किमतीच्या 25 टक्के व राखीव प्रवर्गातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक, माजी सैनिक, अपंग व महिलांसाठी 36 टक्के अनुदान देय आहे. प्रकल्प मर्यादा उत्पादन उद्योगासाठी 25 लाख, तर सेवा उद्योगासाठी 10 लाख रूपये आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. किमान आठवी उत्तीर्ण असलेल्यांनाही उत्पादन उद्योगासाठी 10 लाख व सेवा उद्योगासाठी 5 लाख एवढ्या प्रकल्प मर्यादेत अर्ज करता येतो. अधिक माहिती व ऑनलाईन अर्जासाठी अर्जदारांनी www.kviconline.gov.inया संकेतस्थळावर लॉगइन करून पीएमईजीपीईच्या पोर्टलला भेट द्यावी. अडचण आल्यास अमरावती जिल्हा उद्योग केंद्र (दूरध्वनी 0721- 2662644), खादी व ग्रामोद्योग मंडळ (2662762) किंवा नागपूरच्या खादी व ग्रामोद्योग आयोगाशी (0712-2565151) संपर्क साधावा.                                या योजनेत 18 ते 45 वयोगटातील किमान सातवी उत्तीर्णांना अर्ज करता येतो.  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट आहे. उद्योगासाठी 25 ते 50 लाख रूपयांपर्यंत बँकेमार्फत कर्ज मिळवून दिले जाते. योजनेत 25 ते 35 टक्के अनुदान दिले जाते. इच्छूकांनी www.maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. काही अडचण आल्यास जिल्हा उद्योग केंद्र किंवा खादी ग्रामोद्योग मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. बांगर यांनी केले आहे.

Leave A Comment