Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

रोटरी क्लब अमरावती तर्फे खोलापुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये शिल्ड मास्क, थर्मा मिटर व स्यानिटायझरचे वितरण

रोटरी क्लब अमरावती तर्फे खोलापुरी गेट पोलीस स्टेशन ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे उपस्थित क्लब तर्फे शिल्ड मास्क ,थर्मामीटर ,व स्यानिटायझरचे वाटप करण्यात आले एकूण पंचाहत्तर कर्मचाऱ्यांना शिल्ड मास्कचे वाटप केले.क्लबचे कोशाध्यक्ष रोटेरियन संजय छांगणी, यांनी क्लब बाबत सविस्तर माहिती दिली, क्लबच्या अध्यक्ष यांनी कोविड १९ मध्ये पोलीस यंत्रणा दिवसरात्र आपले प्राण धोक्यात घालून अहोरात्र कार्य करीत आहे, त्यांचे या कार्याला आम्ही नमन करतो,असे मत व्यक्त केले, पोलीस निरीक्षक यांनी तुम्ही आमच्या कामाची आवर्जून दखल घेतल्या बद्दल क्लबचे आभार मानले.या कार्यक्रमा चे संपूर्ण श्रेय रोटेरियन लालचंद बन्साली यांचे आहे, त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला संपर्क साधून पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन कार्यक्रमाची वेळ व तारीख निश्चित केली.कार्यक्रमाला सर्वस्वी क्लबच्या अध्यक्ष रोटेरियन संध्या अनंत उंबरकर,कोषाध्यक्ष रोटेरियन संजय छांगणी, क्लबचे पीआरओ रोटेरियन अशोकभाई असोरिया, रोटेरियन लालचंद बन्साली , श्री अनंत उंबरकर, दिव्या व देवांशी बन्साली उपस्थित होते.

Leave A Comment