Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

प्रा.विजय लुंगेंना रोटरीचा नेशन बिल्डर अवार्ड घोषित

अमरावतीः अनेक वर्षांपासून युवक चळवळ तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रा.विजय लुंगे यांना रोटरी क्लब ऑफ परतवाडा तसेच रोटरी इंटरनॅशनलच्या वतीने नेशन बिल्डर अवार्ड घोषित करण्यात आला आहे. आदिवासी क्षेत्रात स्पर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करत असलेल्या प्रा.विजय लुंगे यांना घोषित झालेल्या पुरस्कारामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे. श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रा.विजय लुंगे यांनी गेल्या ४० वर्षांपासून युवक बिरादरी या राष्ट्रीय युवक चळवळीच्या माध्यमातून देशभर युवक कार्य केले असून त्यांना युवक बिरादरीने राष्ट्रीय युवा संघटक तसेच वनराई पुरस्कार देऊन देखील गौरविले आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती राज्य युवा संघटक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा हिरोजी उलेमाले उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. प्रा.लुंगे यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमातून राज्यभरातील तरूण उद्योजकांना प्रशिक्षण दिले असून त्यांना एमसीईडीचा उत्कृष्ट व्याख्याता गौरव पुरस्कार तब्बल तीन वेळा प्राप्त झाला आहे. तसेच विश्वमाता संघटना पुणे यांच्याकडून नॅशनल इनोव्हेटीव्ह टिचर अवार्ड त्यांना बहाल करण्यात आला आहे. सातत्याने विविध क्षेत्रात काम करून समाजातील तरूणांच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देत प्रा. लुंगे यांनी सेवानिवृत्तीनंतर आपले उर्वरित आयुष्य मेळघाटातील आदिवासी तरूण तसेच मुलांच्या विकासासाठी खर्ची घालण्याचा संकल्प केला असून त्यानुसार त्यांनी जीवन समृद्धी केंद्राची स्थापना बिहाली येथे करून तेथून आपले सामाजिक कार्य सुरू केले आहे. वृक्षारोपण, आदिवासी मुलांना शिष्यवृत्ती तसेच नागरिकांच्या उत्थानासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ परतवाडा यांच्या शिफारशीवरून प्रा.लुंगे यांना रोटरी इंटरनॅशनलने आता नेशन बिल्डर अवार्ड घोषित केला आहे. लवकरच हा पुऱस्कार त्यांना एका विशेष कार्यक्रमातून बहाल केला जाणार आहे. प्रा.लुंगे यांना पुरस्कार घोषित झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave A Comment