Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

जळगावात सायबर टोळीचा पर्दाफाश; 412 कोटींच्या चोरीचा प्रयत्न फसला, पत्रकाराला अटक

जळगाव: देशभरातील विविध ठिकाणच्या खातेदारांचा एटीएम कार्डसह बँक खात्याशी संबंधित डाटा मिळवून त्या माध्यमातून 412 कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीच्या प्रयत्न जळगाव पोलिसांनी हाणून पाडला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या विशेष निरीक्षणात रामानंद गनर पोलिसांनी इथिकल हॅकर मनीष भंगाळे याच्या मदतीनं अत्यंत अभ्यासपूर्ण तपास व चौकशी करुन सापळा रचून सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे.या टोळीतील मुख्य संशयित हेमंत ईश्‍वरलाल पाटील (वय- 42, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) व बांधकाम ठेकेदार मोहसीन खान ईस्माईल खान (वय-35, रा.देवपूर, धुळे) या दोन्ही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आणखी देशभरातील विविध ठिकाणच्या सात संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधार्थ चार पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. संशयितांकडून मिळालेल्या विविध बँक खातेदारांच्या डाटाचा रक्कमेचा विचार केला तरी अब्जावधीची रक्कम पोलिसांच्या सतर्कतेमुळे व वेळीच अभ्यासपूर्ण तपासामुळे चोरी होण्यापासून सुरक्षित राहिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून बँकेचा डाटा खरच सुरक्षित आहे का? असाही प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देशभरातील बिल्डर, उद्योगपती, राजकारणी, बड्या आसामींचे कोट्यवधी रुपये असलेल्या बँक खात्यांचे डिटेल्स चोरी झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या टोळीमधील आतापर्यंत नऊ संशयित पोलिसांना निष्पन्न झाले असून ते खान्देशासह इतर राज्यातील हेत. या टोळीमध्ये बँक अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Leave A Comment