Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

आवास योजनांच्या कामांना गती द्यावी- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती: जिल्ह्यात आवास योजनांत रखडलेली व अपूर्ण कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.बचत भवनात जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार प्रताप अडसड, जिल्हा प्रशासन अधिकारी राजेंद्र फातले, सर्व नपा मुख्याधिकारी व जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, रमाई आवास योजना व इतरही आवास योजनांतील रखडलेली कामे निश्चित कालावधी ठरवून नियोजनपूर्वक पूर्ण करावीत. प्रधानमंत्री आवास योजनेत नगरपरिषद व नगर पंचायत हद्दीतील शासकीय जमीनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले की, माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहिमेत प्रथम टप्प्यामधील कामे पूर्ण झाली आहेत. दुसरा टप्पाही प्रभावीपणे राबवावा. अनुकंपा प्रस्तावाबाबत यादी जिल्हास्तरावर अद्ययावत करुन पुढील प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी. नागरी भागामध्ये किमान एक प्रेक्षणीय स्थळ किंवा उद्यान असणे आवश्यक आहे. त्यासाठी नगरपालिकांनी कार्यवाही करावी, तसेच किमान पन्नास विद्यार्थ्यांकरिता नागरी भागात सार्वजनिक वाचनालय करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. सभेला कर व प्रशासकीय अधिकारी सागर ठाकरे, अमित सा. वानखडे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थीत होते.

Leave A Comment