Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

वरूड संत्रानगरीतून किसान रेल्वेद्वारे 119 मे.टन संत्रा दिल्लीला रवाना वरुड येथे संत्रा प्रक्रिया केंद्राचाही शुभारंभ

अमरावती: वरुड संत्रा नगरीतून किसान रेल्वेव्दारे दिल्ली येथे संत्रा पाठविण्यात आला. आमदार देवेंद्र भुयार व जिल्हाधिकारी शैलेश नवाल हिरवी झेंडी दाखवून बुधवारी रेल्वे मार्गस्थ केली. बिग बास्केट व श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी, वरूड यांच्या संयुक्त विद्यमाने वरूड येथे संत्रा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटनही झाले. वरुड संत्रा नगरी रेल्वे स्टेशन आझादपूर मंडी दिल्ली येथे पाच पार्सल वॅनद्वारे ११९ मे. टन संत्रा पाठविण्यात आला. किसान रेल्वेमध्ये ११५ मे.टन एम.के.सी ॲग्रोफ्रेश लि. चा व ४ मे. टन श्रमजीवी नागपुरी संत्रा प्रोड्युसर कंपनी लि. यांनी पाठविला. वरुड संत्रा नगरी येथून दर बुधवारी धावणाऱ्या किसान रेल्वेचा शुभारंभ आमदार श्री. भुयार व जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या उपस्थितीत झाला. किसान रेल्वेद्वारे शेतकरी व व्यापा-यांना 50 टक्के सबसिडी देण्यात आली. या मालभाड्यातील सूट यापुढेही नियमित सुरू ठेवण्यात येईल, असे रेल्वेने कळविले आहे. बिग बास्केट व श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने संत्रा प्रक्रिया केंद्राचे उद्घाटनही यावेळी झाले. जिल्ह्यातील संत्रा हे महत्वाचे फळपीक असून, त्याबाबत अधिक संशोधन व विपणनासाठी भरीव प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन आमदार श्री. भुयार यांनी केले. संत्रा उत्पादक शेतक-यांनी गुणवत्तापूर्ण संत्रा उत्पादित करून देशांतर्गत व विदेशातील बाजारपेठेत व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी विशद केली. श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीच्या सहकार्याने बिग बास्केटच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण संत्र्यांच्या ऑनलाईन मार्केटिंगची संधी निर्माण झाली, असे जयदीप सूर्यवंशी यांनी सांगितले. याप्रसंगी एम.के.सी अग्रोफ्रेश लि.चे सोनू खान, श्रमजीवीचे निलेश मगर्दे, मुख्य अधिकारी रमेश जिचकार, प्रमोद कोहळे, सुभाष शेळके, विष्णुपंत निकम, राजाभाऊ कुकडे, रामचंद्र राऊत, जमीर पठाण, प्रफुल्ल सांबारतोडे, ऋषिकेश राऊत, अजिंक्य जिचकार, मनोज बाडे, पुंडलिक हरले, बाबाराव गायकवाड, बिल्लू चाचा, अरविंद भुसारी, मारोतराव लोखंडे, व रेल्वे विभागाचे डाँ विपुल, श्री आचार्य, संजय गंभीर व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave A Comment