Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे सव्वाशे कर्मचा-यांची तपासणी

अमरावती: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत अधिकारी व कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवनात आज आयोजित करण्यात आले. सव्वाशेहून अधिक अधिकारी- कर्मचा-यांनी त्यात सहभाग घेतला.जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचा-यांनी यावेळी तपासणी करून घेतली. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत केवळ कोरोनाच नव्हे, तर हृदयविकास व इतरही विविध आजारांच्या तपासणीसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनीही यावेळी तपासणी करून घेतली. शिबिरात 100 हून अधिक पुरूष कर्मचारी व सुमारे 25 महिला कर्मचा-यांनी सहभागी घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या सहकार्याने आरोग्य पथक उपलब्ध झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिली.

Leave A Comment