Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने हत्या

जळगाव : जिल्ह्यातील रावेर येथे बोरखेडा रस्त्यानजीकच्या शेतामधील एका घरात चार अल्पवयीन भावंडांची हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ही हत्या कोणी आणि कशासाठी केली, याची माहिती मिळू शकलेली नाही. अज्ञाताकडून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेने जिल्हा संपूर्ण हादरुन गेला आहे. रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दाम्पत्य आपल्या मध्यप्रदेशातील मूळ गावी गेले आहे. मात्र, शेतातील घरात ही चार भावंडे एकटीच राहत होती. रात्रीच्या सुमारास या चारही भावंडांची कुर्‍हाडीने हत्या केल्याचे पुढे आले आहे. आज सकाळी शेतमालक शेतात आल्याने हा सगळा प्रकार उघड झाला.मृतांमध्ये १२, ११, ८ आणि ३ या वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. यात १२ वर्षांची मोठी बहीण आणि तीन वर्षांची चिमुकलीचा समावेश आहे. तर एका भावाचे वय ११ आणि दुसऱ्या भावाचे वय अवघे ८ वर्ष आहे. या लहान मुलांची का हत्या करण्यात आली, याचे कारण उलगडलेले नाही. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. अल्पवयीन भावंडांच्या हत्येने रावेर शहरात सन्नाटा पसरला आहे.

Leave A Comment