Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

रुक्मिणीनगर, साई हॉस्‍पीटल, मालटेकडी, पंचवटी, कॉटन मार्केट, चौधरी चौक, जयस्‍तंभ चौक, सरोज चौक, राजकमल चौक येथे रोड वरील अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही

अमरावती प्रतिनिधीः रुक्मिणीनगर, साई हॉस्‍पीटल, मालटेकडी, पंचवटी, कॉटन मार्केट, चौधरी चौक, जयस्‍तंभ चौक, सरोज चौक, राजकमल चौक येथे अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही करण्‍यात आली. अतिक्रमण पथक प्रमुख यांचे आदेशानुसार सदर कार्यवाही राबविण्‍यात आली. या कार्यवाही मध्‍ये मुख्‍य रस्‍त्‍यावरील अतिक्रमण नष्‍ट करुन रोड व फुटपाथ मोकळे करण्‍यात आले. रुक्मिणीनगर, साई हॉस्‍पीटल, मालटेकडी, पंचवटी, कॉटन मार्केट, चौधरी चौक, जयस्‍तंभ चौक, सरोज चौक, राजकमल चौक येथुन हातगाड्या दुकाना समोरील अनधिकृत ठेवलेले साहित्‍य व इतर दोन ट्रक साहित्‍य भरुन नेण्‍यात आला. यावेळी अतिक्रमण निरीक्षक उमेश सवई, योगेश कोल्‍हे, पोलीस पथकातील श्री विनोद गेडाम, पोलीस कर्मचारी, अतिक्रमण कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही निरंतर सुरु ठेवण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहे. रस्‍त्‍यावरील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण काढून ते पादचारी मार्गासाठी मोकळे करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहे.

Leave A Comment