Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करा

पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करा-आमदार रवी राणा यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्देश,,लोकडाऊन मुळे परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात परतल्यामुळे कंत्राटदारांनी इतर ठिकाणावरून अमरावती जिल्ह्यात परतलेल्या हजारो स्थानिक,शहरी ग्रामीण भागातील कुशल अकुशल श्रमिक-शेतमजुरांना कामे देऊन रोजगार द्यावा,,,कुठल्याच कारणाशिवायआता रस्ते,नाल्या,पूल, समाजमंदिर,व इतर विकासकामे तात्काळ गती देऊन पूर्णत्वास न्यावी,,सर्व बांधकाम अधिकारी-कर्मचारी यांना आमदार रवी राणा यांचे निर्देश अमरावती-कोरोना लॉकडाऊन मुळे संपूर्ण जिल्ह्यातील विकासकामे ठप्प आहेत.स्थानिक विकास निधी,,केंद्र शासन ,राज्य शासन,जिल्हा परिषद, मनपा,जिल्हा नियोजन, मूलभूत,आदी अनेक प्रकारच्या निधीतून अमरावती,बडनेरा,, दर्यापूर,अंजनगाव सुर्जी, परतवाडा अचलपूर,धारणी चिखलदरा, चांदुर बाजार,तिवसा या तालुक्यांसह जिल्ह्यातील विविध भागात सुरू असणारी सर्व कामे अचानक बंद झाली.हाताला काम नाही,खायला धान्य माही व गरजा भागवायला पैसे नाहीत या कारणामुळे या ठिकाणी काम करणारे मजूर आपापल्या राज्यात प्रांतात रवाना झाले. परराज्यातून येऊन जी कंत्राटदार मंडळी कामे करीत होती ती सर्व कामे अचानक बंद पडली.विकासाची गती मंदावली व रोजगारनिर्मिती थांबली. आता लोकडाऊन च्या 4 थ्या टप्प्यात शासन निर्देशानुसार सर्व अटी व नियमांचे पालन करून ,सोशल डिस्टनसिंग पाळून व सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून तात्काळ ही कामे सुरू करावी असे निर्देश आमदार रवी राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिले. या बैठकीला आमदार रवी राणा यांचेसह मुख्य अभियंता श्री नवघरे, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा,कार्यकारी अभियंता श्री शेंडगे,श्री जवजाळ ,उपकार्यकारी अभियंता प्रकाश देशमुख,श्री काळमेघ, श्री काजी यांचेसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पावसाळा तोंडावर आला असून कामांची प्राथमिकता ठरविणे गरजेचे असल्याचे सांगून शक्यतोवर सर्वच खोळंबलेली कामे युध्दस्तरावर प्रयत्न करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करणे व ती कामे पूर्णत्वास नेणे यासाठी अधिकारी कर्मचारी कंत्राटदार यांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. मेळघाट असो वा शहर किंवा ग्रामीण प्रत्येक वस्ती,प्रत्येक वॉर्ड,प्रत्येक तांडा,प्रत्येक मोहल्ला कुठेही पावसाळ्यात या अर्धवट विकासकामांमुळे अडथळा निर्माण होणार नाही,अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी अश्या सूचनाही आमदार रवी राणा यांनी या वेळी दिल्या. लॉक डाउन मुळे अनेक परप्रांतीय श्रमिक आपल्या गावी परत गेले आहेत त्यामुळे मंजुरांचा तुटवडा निर्माण होऊन त्याचा परिणाम या कामावर होऊ नये यासाठी इतर भागातून आपल्या जिल्ह्यात परत आलेल्या स्थानिक मजूर मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महसूल यंत्रणासोबत समन्वय साधून स्थानिक कुशल-अकुशल कामगारांची-श्रमिकांची तालुकानिहाय यादी तयार करून त्यांना या कामावर रोजगार द्यावा जेणेकरून कामे पण होतील व स्थानिकांना रोजगार पण मिळेल असा अभिनव उपाय आमदार रवी राणा यांनी सुचविला.या अभिनव उपायांमुळे निश्चितच स्थानिकांना न्याय मिळेल असे उपस्थितांनी म्हटले. सर्व कामे तात्काळ नियमांचे पालन करून सुरू करावे असे निर्देश आमदार रवी राणा यांनी दिले.यावेळी ,आशिष कावरे, हर्षल रेवणे,उमेश ढोणे, अवि काळे,खूष उपाध्याय,जीतेंद्र वरू,शुभम उंबरकर,अजय बोबडे,राहुल काळे,अंकुश आडे आदी उपस्थित होते

Leave A Comment