Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व कोरोना संक्रमित ४१,१९२,९३२ डिस्चार्ज ३०,७०९,८४० मृत्यू १,१३१,५६८ |
  • महाराष्ट्र कोरोना संक्रमित १६,१७,६५८ इलाज शुरु १,५८,८५२ डिस्चार्ज १४,१५,६७९ मृत्यू ४२,६३३ |
  • अमरावतीत कोरोना संक्रमीत १५,६८५ इलाज शुरु १०९९ डिस्चार्ज १४१५९ मौत ३५४ |
  • भारत कोरोना संक्रमण ७६,९४,७९२ इलाज शुरु ७,१९,९७७ डिस्चार्ज ६८,५७,०३२ मौत १,१६,४९७ |

आता एसटीव्दारे मालवाहू सेवा...

अमरावती, दि. 26 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतूकीसोबतच माल वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याअनुषंगाने अमरावती विभागाद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात माल वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. माल वाहतूकीकरिता परिवहन विभागाव्दारे तात्काळ सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. माल वाहतूक ही पूर्णतः सुरक्षितपणे केल्या जाणार असून मालाचे वेळेवर वितरण केल्या जाईल. ही सेवा राज्यात कोणत्याही भागात त्वरित करण्यात आली असून २४ तास सुरु राहणार आहे. माल वाहतूकीचे दर हे अत्यंत माफक प्रमाणात असून माल वाहतूकीच्या सेवेचा लाभ शेतकरी,व्यापारी, लघु व मोठे कारखानदार तसेच शासकीय, निमशासकीय खात्यास मिळणार आहे. माल वाहतूक ही अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकावरुन करण्यात येऊन त्याकरिता बसस्थानकावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. माल वाहतूकीचे कामकाजाकरिता कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून या कामकाजावर विभागीय वाहतूक अधिकारी व विभागीय भांडार अधिकारी यांची देखरेख राहणार आहे. यासाठी अमरावतीच्या विभागीय भांडार अधिकारी यांची समन्वय अधिकारी (नोडल अधिकारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यावर विभाग नियंत्रक यांचे नियंत्रण राहणार आहे. परिवहन महामंडळाची माल वाहतूक सेवा ही अत्यंत माफक दरात सुरक्षित असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यापारी, शेतकरी, व्यापारी, लघु व मोठे कारखानदार व इतर व्यवसायिकांनी तसेच शासकीय, निमशासकीय खात्याने या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी केले आहे.   अधिक माहितीसाठी मालवाहू सेवेच्या अनुषंगाने माहितीसाठी पुढीलप्रमाणे अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे.             विभागीय भांडार अधिकारी/समन्वय अधिकारी ०७२१-२६६२४४८ मो. क्र. ८८८८८७५९७४ विभागीय वाहतूक अधिकारी ०७२१-२६६०३०० मो. क्र. ९९७०७३१११२ विभाग नियंत्रक ०७२१-२६६२२८५ मो. क्र. ९९८७८८३३९६, पर्यवेक्षकीय कर्मचारी रा.पु.तांबेकर, वाहतूक निरीक्षक ९३७३५८९८२६, रा.मा.लुंगे,वाहतूक नियंत्रक ९८८१४८३९६६

Leave A Comment