Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व में ६,२२, ३४३ कोरोना वायरस संक्रमित , मौत २८,८०२ और १९९ देश प्रभावित |
  • महाराष्ट्र में कुल कोरोना संक्रमित १८६ और ४ की मौत |
  • पुणे ३० , मुंबई ६७ , नागपुर ९ , ठाणे ४ , यवतमाल ३ , सांगली २४
  • भारत देश में कोरोना वायरस से संक्रमित लोगो की संख्या १००३ के करीब और २१ की मौत की पुष्टि | २५ राज्य प्रभावित |
  • महाराष्ट्र में संचार बंदी लागु सभी सीमाएं सील की गयी | अंतरजिल्हा सीमाएं भी सील की गयी |
  • संक्रमण के चलते लोगों के एकत्र होने पर प्रतिबंध हैं और सड़क, रेल एवं हवाई यातायात पर 31 मार्च तक रोक । सिर्फ मालगाड़ी चलेगी |
  • महाराष्ट्र में कर्फ्यू लागू हो गया है | बिना वजह सड़क पर निकलने वालों से पुलिस सख्ती से पेश आ रही है | जरूरत पड़ने पर पुलिस उनपर लाठी भी बरसा रही है|

हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. सौ सुलभा खोडके द्वारे उपस्थित केलेला औचित्याच्या मुद्याचे फलीत

अमरावती येथे विभागीय आयुक्तालय आहे. लोकसंख्येची व्याप्ती तथा स्थानीय भौगोलिक परीस्थिती लक्षात घेता, येथे कोणतेही सर्वसुविधांनी परीपुर्ण असे मोठे शासकीय रुग्णालय नाही. ही बाब बघता, अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे. महसुल मुख्यालयाचे ठिकाण असुन सुध्दा तसेच क्षेत्रफळनिहाय विचार केल्यावर जिल्हातील दुर्धर आजारांच्या रुग्णांना अत्याधूनिक आरोग्य सुविधांच्या उपलब्धी अभावी वर्धा, नागपुर किंवा मुंबई येथे उपचाराकरीता जावे लागत आहे. यावेळी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना उपचारार्थ ये - जा करतांना विविध समस्यांचा सुध्दा सामना करावा लागत आहे. यासोबतच अमरावती विभागामध्ये असलेला मेळघाट हा भाग दुर्गम ओळखला जातो स्थानीकांना कुपोषणाच्या समस्येशी सातत्याने लढावे लागत आहे. अमरावती विभागातील विशेषतः मेळघाटातील कुपोषणाचे निर्मुलन करण्याकरीता 21 डिसेंबर 2019 रोजी नागपुर स्थित हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. सौ सुलभा खोडके यांचे वतीने अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले पाहीजे. या करीता सभागृहामध्ये औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंतीपत्र देण्यासह त्यांचे या बाबीकडे आमदार महोदयांचे वतीने लक्ष सुध्दा वेधण्यात आले होते. वैद्यकीय शिक्षण संचालकाद्वारे करण्यात आलेला पाहणी, शासनाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव तसेच आ. सौ. सुलभा खोडके यांचे वतीने राज्य शासन तथा वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे द्वारा केल्या जाणारा सातत्यपुर्ण पाठपुरावा यामुळे आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसंदर्भात शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. सध्या राज्यामध्ये शासकीय, महानगरपालीका, केंद्रशासन, खाजगी विनाअनुदानीत आणि अभिमत विद्यापीठाची एकुण वैद्यकीय महाविद्यालयांची उपलब्धीवर एक दृष्टीक्षेप टाकला असता, अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध नाही. ही बाब स्पष्ट झाली आहे. अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापनेच्या दृष्टीकोनातुन प्राथमिक तपासणी करीता गठीत करण्यात आलेल्या समितीच्या वतीने 11 जुलै 2019 रोजी देण्यात आलेल्या भेटीनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या दृष्टीकोनातुन प्राथमिक तपासणी पश्चात संचालनालयाकडे अभिप्राय सादर केला आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडुन सदर तपासणी अहवाल राज्यशासनाकडे सादर सुद्धा करण्यात आला आहे. संबंधीत प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधिन असल्याने पुढील आवश्यक कार्यवाही प्रकीया सुध्दा गतीने सुरु आहे. वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री नामदार- अमित विलासराव देशमुख यांचे कार्यालयाचे वतीने अशा आशयाचे पत्र सुध्दा प्राप्त झाले आहे. आमदार सुलभा खोडके यांच्या सातत्यपुर्ण पाठपुरावा तथा घेण्यात आलेल्या पुढाकारामुळे अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेचा मार्ग आता सुकर झालेला आहे. त्यामुळे आता दुर्धर आजारांच्या रुग्ण व त्यांचे नातेवाईकांची होणारी गैरसोय निश्चीत टळणार आहे.

Leave A Comment