Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व में ६,२२, ३४३ कोरोना वायरस संक्रमित , मौत २८,८०२ और १९९ देश प्रभावित |
  • महाराष्ट्र में कुल कोरोना संक्रमित १८६ और ४ की मौत |
  • पुणे ३० , मुंबई ६७ , नागपुर ९ , ठाणे ४ , यवतमाल ३ , सांगली २४
  • भारत देश में कोरोना वायरस से संक्रमित लोगो की संख्या १००३ के करीब और २१ की मौत की पुष्टि | २५ राज्य प्रभावित |
  • महाराष्ट्र में संचार बंदी लागु सभी सीमाएं सील की गयी | अंतरजिल्हा सीमाएं भी सील की गयी |
  • संक्रमण के चलते लोगों के एकत्र होने पर प्रतिबंध हैं और सड़क, रेल एवं हवाई यातायात पर 31 मार्च तक रोक । सिर्फ मालगाड़ी चलेगी |
  • महाराष्ट्र में कर्फ्यू लागू हो गया है | बिना वजह सड़क पर निकलने वालों से पुलिस सख्ती से पेश आ रही है | जरूरत पड़ने पर पुलिस उनपर लाठी भी बरसा रही है|

शिवटेकडी येथे सेंद्रिय भाजीपाला लागवड प्रात्‍यक्षिक व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

अमरावती शिवटेकडी येथे सेंद्रिय भाजीपाला लागवड, प्रात्‍यक्षिक व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन मा.महापौर चेतन गावंडे यांचे हस्‍ते करण्‍यात आले. या उदघाटन कार्यक्रमात उपमहापौर कुसुम साहु, मनपा आयुक्‍त संजय निपाणे, सभागृह नेता सुनिल काळे, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, गटनेता चेतन पवार, गटनेता दिनेश बुब, झोन सभापती सोनाली नाईक, शिक्षण समिती सभापती गोपाल धर्माळे, नगरसेवक संजय नरवणे, मिलींद चिमोटे, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, आशिष अतकरे, प्रदिप हिवसे, विजय वानखडे, बलदेव बजाज, नगरसेविका संध्‍या टिकले, वंदना कंगाले, जयश्री डहाके, नुतन भुजाडे, जयश्री कु-हेकर, रिता पडोळे, रामेश्‍वर अभ्‍यंकर, उपआयुक्‍त (प्रशा.) सुरेश पाटील, उपआयुक्‍त (सा.) विजय खोराटे, उद्यान अधिक्षक प्रमोद येवतीकर, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ. सचिन बोंन्‍द्रे, डॉ. अजय जाधव, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्‍यवरांनी भाजीपाला लागवड, प्रात्‍यक्षिक व प्रशिक्षण केंद्राची माहिती जाणून घेतली. भाजीपाला लागवड, प्रात्‍यक्षिक व प्रशिक्षण केंद्रात सेंद्रिय खताव्‍दारे भाजीपाला कसा निर्माण करायचा यांचे प्रात्‍यक्षिक व प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. दुपारी 1 ते 3 यावेळात सदर प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. घरीच भाजीपाला निर्माण करण्‍यासाठी पण सदर प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे. सदर केद्रात सेंद्रिय शेती कशी करावी यांची माहिती देण्‍यात येणार आहे. घरीच भाजीपाला निर्माण होवू शकणार आहे. कोणतेही रासायनीक खते न वापरता भाजीपाला लावता येणार आहे. शिवटेकडी वरील पालापाचोळ्यापासुन खत निर्मीती करुन सदर भाजीपाला निर्माण करण्‍यात येत आहे. शेतकरी कश्‍या प्रकारे मेहनत करुन पिक काढतो यांची पण जाणीव नागरीकांना या माध्‍यमातुन होवू शकणार असल्‍याची माहिती गटनेता दिेनेश बुब यांनी यावेळी दिली. शिवटेकडीवर जमा होणारा काडीकचरा उन्‍हाळ्यात आगीच्‍या भक्षस्‍थानी पडत होता. त्‍यामुळे झाडे सुध्‍दा सोकायला लागली होती. दिनेश बुब नगरसेवक यांच्‍या पुढाकाराने यावर उपाय म्‍हणुन सेंद्रीय शेती हा प्रकल्‍प हाती घेण्‍यात आला. काडीकचरा जमा करुन त्‍यावर शेणखत व जीवाणू कल्‍चर वापरुन बायो डायना‍मीक पध्‍दतीने खत तयार करण्‍यात येत आहे. सेंद्रिय भाजीपाला व उत्‍पादन याची प्रात्‍याक्षिक हाती घेण्‍यात आले असून सांभार, मेथी व इतर भाजीपाला तयार करुन किटकनाशक विरहीत भाजीपाला तयार करण्‍याचे प्रशिक्षण कोणत्‍याही नागरीकांना देण्‍याचे नियोजन आहे. येथे प्रत्‍यक्ष भाजीपाला सेंद्रीय पध्‍दतीने तयार केलेले खत वापरुन तयार होत आहे. त्‍यामुळे लोकांमध्‍ये एक प्रकारे त्‍याची जागरुकता निर्माण होवून रोगराईवर प्रतिबंध घालण्‍याचा हा एक प्रयत्‍न आहे. सदर उदघाटन कार्यक्रमात शिवटेकडी संवर्धन समितीचे सदस्‍य दिलीप वाकोडे, सी.ए. विजय जाधव, कॅप्‍टन लुंगारे, राजाभाऊ पिदळी, रमेश परमार, राजु पाटील, रवि काळमेघ, राजु शर्मा, गुड्डु तिवारी, प्रदिप देशमुख, दिलीप सोलापुरे, रमेश व-हेकर, मोहन पुंड व महिला वर्ग उपस्थित होता.

Leave A Comment