Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व में ६,२२, ३४३ कोरोना वायरस संक्रमित , मौत २८,८०२ और १९९ देश प्रभावित |
  • महाराष्ट्र में कुल कोरोना संक्रमित १८६ और ४ की मौत |
  • पुणे ३० , मुंबई ६७ , नागपुर ९ , ठाणे ४ , यवतमाल ३ , सांगली २४
  • भारत देश में कोरोना वायरस से संक्रमित लोगो की संख्या १००३ के करीब और २१ की मौत की पुष्टि | २५ राज्य प्रभावित |
  • महाराष्ट्र में संचार बंदी लागु सभी सीमाएं सील की गयी | अंतरजिल्हा सीमाएं भी सील की गयी |
  • संक्रमण के चलते लोगों के एकत्र होने पर प्रतिबंध हैं और सड़क, रेल एवं हवाई यातायात पर 31 मार्च तक रोक । सिर्फ मालगाड़ी चलेगी |
  • महाराष्ट्र में कर्फ्यू लागू हो गया है | बिना वजह सड़क पर निकलने वालों से पुलिस सख्ती से पेश आ रही है | जरूरत पड़ने पर पुलिस उनपर लाठी भी बरसा रही है|

शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांची साठवण काळजीपूर्वक व योग्य पद्धतीने करावी

अमरावती: अमरावती विभागातील सोयाबीन पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 14.51 लाख हेक्टर असून या पिकाखालील पेरणी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढणाऱ्या क्षेत्रासाठी जास्तीच्या बियाण्यांची गरज भासणार आहे. राज्यामध्ये सन 2019 मध्ये उशिरा पाऊस व सोयाबीन पिकाच्या काढण्याच्या कालावधीतील अवेळी पावसामुळे सोयाबीन बियाणे उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील दोन हंगामामध्ये प्रमाणित बियाण्यांची पेरणी करुन उत्पादित केलेले बियाणे हे पुढील खरीप 2020 साठी व्यवस्थितपणे राखून ठवेणे किंवा साठा करुन ठेवणे गरजेचे आहे. सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक असल्याने व पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे असल्याने दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित होणारे सोयाबीन, हे बियाणे म्हणुन शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित चांगला प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करुन निवड करावी. सोयाबीन बियाण्यांची बाह्यावरण कवच नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. साठवण करण्यापूर्वी बियाणे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ताडपत्री किंवा सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरुन चांगले वाळवावे व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण 9 ते 12 टक्के पर्यंत आणावे. सोयाबीन बियाणे साठवणुक करण्यासाठी बियाण्यांची घरगुती पध्दतीने उगवणशक्ती तपासावी आणि किमान 70 टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे योग्य पध्दतीने साठवणूक करावे. वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फारेलपटे, काडीकचरा, माती खडे इत्यादी काढुन ते स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगला किंवा नविन पोत्यात साठवुन ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते त्यामुळे साठवणीचे ठिकाण थंड ओलविरहित व हवेशीर असावे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करुन नये. बियाणे साठतांना त्याची थप्पी 7 फुटांपेक्षा जास्त व 40 किलोच्या पोत्यांमध्ये भरलेले असल्यास 8 पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये अन्यथा सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवण शक्ती कती होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासुन 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी. बियाण्यांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यासाठी पोत्याची रचना उभ्या-आडव्या पध्दतीने करावी. आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकचा वापर करावा तेसच उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीनच्या बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपुर्वक करावी. पोती उंचावरुन आदळली जाणार नाही याची काळजी घ्यावी. खरीप हंगाम 2020 मध्ये सोयाबीन उपलब्धतेची व्याप्ती वाढवावी व सोयाबीन बियाण्यांचा तुडवडा निर्माण होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती सुभाष नागरे यांनी केले आहे

Leave A Comment