Site Logo
ब्रेकिंग न्यूज़
  • विश्व में ६,२२, ३४३ कोरोना वायरस संक्रमित , मौत २८,८०२ और १९९ देश प्रभावित |
  • महाराष्ट्र में कुल कोरोना संक्रमित १८६ और ४ की मौत |
  • पुणे ३० , मुंबई ६७ , नागपुर ९ , ठाणे ४ , यवतमाल ३ , सांगली २४
  • भारत देश में कोरोना वायरस से संक्रमित लोगो की संख्या १००३ के करीब और २१ की मौत की पुष्टि | २५ राज्य प्रभावित |
  • महाराष्ट्र में संचार बंदी लागु सभी सीमाएं सील की गयी | अंतरजिल्हा सीमाएं भी सील की गयी |
  • संक्रमण के चलते लोगों के एकत्र होने पर प्रतिबंध हैं और सड़क, रेल एवं हवाई यातायात पर 31 मार्च तक रोक । सिर्फ मालगाड़ी चलेगी |
  • महाराष्ट्र में कर्फ्यू लागू हो गया है | बिना वजह सड़क पर निकलने वालों से पुलिस सख्ती से पेश आ रही है | जरूरत पड़ने पर पुलिस उनपर लाठी भी बरसा रही है|

बालकामगाराची विटभट्टीवरुन सुटका

अमरावती: फेब्रुवारी महिना हा बाल कामगार कृती महिना म्हणून राबविण्याबाबत शासन निर्देश आहे. त्याअनुषंगाने कामगार उपआयुक्त वि. रा. पानबुडे व सहायक कामगार आयुक्त अ. उ. कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल व किशोरवयीन (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 अंतर्गत जिल्ह्यात बालकामगारांच्या तपासणीकरीता धाडसत्र राबविण्यात आले. या धाडसत्रात ‍निंभोरानगर झोपडपट्टी स्थित अब्दुल मेहफुज अब्दुल कादिर यांच्या विटभट्टीवर काम करीत असलेल्या किशोरवयीन कामगाराची कृतीदलाव्दारे मुक्तता करण्यात आली. अश्याप्रकारच्या धाडसत्रांचे आयोजन जिल्ह्यात यापुढेही नियमित केल्या जाणार असून जिल्ह्यातील कोणत्याही धोकादायक आस्थापनाधारकांनी वय वर्ष 18 पेक्षा कमी वय असलेल्या कामगारांना कामावर ठेवू नये तसेच कोणत्याही पालकाने वय वर्ष 18 पेक्षा कमी वय असलेल्या पाल्यांना कामावर पाठवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. या धाडसत्रामध्ये जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अजय देशमुख, सरकारी कामगार अधिकारी प्र. रा. महाले, रा.रा. काळे, सुविधाकार रा. भ. बनाफर, अ. बा. खेतखेडे, अ.ब. कांबळे, सं.ना. धुर्वे, शि.मा. नेने, समुपदेशकक आकाश बरवट, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अजय देशमुख आदी टिम मेंबर यांनी यशस्वीरित्या काम पार पडले.

Leave A Comment