Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जुनीवस्‍ती बडनेरा येथे सौंदर्यीकरण कामाचे भुमिपूजन संपन्‍न

प्रभाग क्र.21 जुनीवस्‍ती बडनेरा येथे विकास कामाचे भुमिपूजन ज्‍येष्‍ठ महिला यांच्‍या शुभहस्‍ते राम मंदिर बडणेरकर (मसाले महाराज) यांच्‍या घरासमोर पार पाडले. ह्या प्रसंगी सन्‍मा.नगरसेविका तथा झोन सभापती गंगाताई अंभोरे यांनी प्रस्‍तावित केलेल्‍या मनपा वार्ड विकास निधी मंजुर करुन आणली आहे. महानगरपालिकेचे सन्‍मा. नगरसेविका तथा झोन सभापती गंगाताई अंभोरे यांनी परिसरातील नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्‍यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या त्याकरीता लगेचच कार्यवाही चे त्यांनी आश्वासन दिले. परिसरातील सर्व नागरीकांनी सन्‍मा. नगरसे‍विका तथा झोन सभापती गंगाताई अंभोरे यांचे कार्याची प्रशंसा केली. यावेळी परिसरातील नागरीक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Leave A Comment