Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आमदार सौ सुलभा संजयराव खोडके यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

अमरावतीः दिनांक ३१ मार्च २०१८ रोजी खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत नालसाहेबपुरा, अमरावती येथे जनाब इरफानशहा रुस्तमशहा, वय ३७ वर्षे व त्यांची पत्नी नाजिया परवीन, वय २८ वर्षे, यांचा त्यांचे राहते घराचे अंगणात कपडे वाळत घालण्याकरिता बांधलेल्या लोखंडी तारेच्या संपर्कात आल्यामुळे, विद्युतधक्का बसून घटनास्थळावरच मृत्यू आला होता. सदर अपघाताची चौकशी करून तत्कालीन विद्युत निरीक्षक व्ही. एन. शिंगणे यांनी सदर्हू अपघात म. रा. वि. वि. कंपनीच्या सदोष वितरण व्यवस्था आणि ग्राहक विजोडणीमुळेच झालेला असल्याचा अहवाल देउन, अपघातग्रस्तांचे वारसदाराना नियमानुसार योग्य नुकसान भरपाई देण्याचे आदेश म. रा. वि. वि. कंपनीस दिले होते. परंतु इरफानशहा रुस्तमशहा व त्यांची पत्नी नाजिया परवीन यांचे पश्चात त्यांची अपत्ये कु. नाशरा फातिमा, वय १.५ वर्षे व चि. अल्फानशहा वय ०९ महिने आणि अशिक्षित वयोवृद्ध आई - वडील वगळता, अन्य कुणीही जवाबदार व सुशिक्षित कुटुंबसदस्य नसल्यामुळे, नुकसान भरपाई संदर्भात करावयाच्या किचकट कायदेशीर कार्यवाही बाबत संबधिताना माहिती नसणे तसेच म. रा. वि. वि. कंपनीच्या उदासीन व वेळकाढू धोरणामुळे, अपघातग्रस्तांचे वारसदारांना जवळ जवळ ०२ वर्षाचा कालावधी लोटूनसुद्धा नुकसान भरपाई देण्यातच आलेली नव्हती. या संदर्भात आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून माहिती मिळताच अमरावती विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौ सुलभा संजयराव खोडके यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय देत, प्राप्त माहितीची गांभीर्यपूर्वक दखल घेउन दिनांक ७ जानेवारी २०२० रोजी व्यक्तीश: अपघातग्रस्तांचे कुटुंबीयांची त्यांचे राहते घरी जाऊन भेट घेतली व त्यांचे सांत्वन करून, प्रकरणाचा सविस्तर वृत्तांत जाणून घेतला. अपघातग्रस्तांचे वयोवृद्ध आई - वडीलांकडून त्यांचेवर ओढवलेल्या अस्मानी संकट आणि घरातील कर्ता तरुण मुलगा तथा सुनेच्या मृत्यूपश्चात २ वर्षांपासून अतिशय लहान नातवंडांचे संगोपन करतांना त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना या बाबत आपबिती ऐकून मा. आमदार महोदया हेलावून गेल्या व त्यांनी म. रा. वि. वि. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि झालेल्या अमानवीय प्रकाराबाबत जाब विचारून अपघातग्रस्तांचे वारसदारांना तातडीने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले. प्राप्त माहिती नुसार म. रा. वि. वि. कंपनीकडून अपघातग्रस्तांचे वारसदारांना लवकरच रुपये ०८ लक्ष इतकी नुकसान भरपाईची रक्कम अदा केली जाणार आहे. आमदार सौ सुलभा संजयराव खोडके यांनी प्रस्तुत प्रकरणी, लोकप्रतिनिधी या नात्याने दाखविलेल्या सामाजिक बांधिलकी व मानवीय दृष्टीकोनामुळे वयोवृद्ध आई - वडील आणि लहान अपत्यांना न्याय मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

Leave A Comment