Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

पोक्सो त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम माउंट आबू (राजस्थान): देशभरातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हेगारांना दयेचा अर्ज करण्याची जी मुभा आहे ती समाप्त करायला हवी, असे स्पष्ट मत राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केले. पोक्सो कायद्यांतर्गत असलेली माफी देण्याबाबतची तरतूद संपुष्टात यायला हवी, असे राष्ट्रपती म्हणाले. पोक्सो अर्थात लैंगिक अत्याचारांपासून मुलींचे संरक्षण करणाऱ्या कायद्यात गुन्हेगारांना दयेचा अर्ज करण्याची जी तरतूद आहे त्यावर संसदेत पुनर्विचार व्हायला हवा, असे मत राष्ट्रपतींनी नोंदवले. सिरोही येथील एका कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. त्यांनी यावेळी महिला सुरक्षेवर चिंता व्यक्त केली. महिलांवरील विविध प्रकारचे अत्याचार रोखण्यासाठी समाजमन बदलण्याची गरज आहे. महिलांप्रती आदर आणि सन्मान वाढल्यास अशा अत्याचाराच्या घटना रोखण्यात मोठा हातभार लागेल. महिला सुरक्षेसाठी अनेक पावले उचलण्यात येत असली तरी हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. याबाबतीत आणखी बरंच काम अपेक्षित आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. महिलांप्रती सन्मान वाढवण्याची जबाबदारी जितकी प्रत्येक आई-वडिलांची आहे तशीच ती तुमची आणि माझीही आहे, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले.

Leave A Comment