Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

प्रथम राष्‍ट्रीय महानगरपालिका शाळा खेळ स्‍पर्धा 2019

अमरावतीः महानगरपालिका स्‍कुल गेम्‍स फेडरेशन ऑफ इंडिया आणि पॅरा स्‍पोर्टस अॅकेडमी दिल्‍ली यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक 26 डिसेंबर,2019 ते 28 डिसेंबर,2019 पर्यंत तीन दिवस राष्‍ट्रीय स्तरावर सर्व महानगरपालिका शाळांच्‍या 12 वर्षा खालील विद्यार्थ्‍यांकरीता विविध खेळ स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आले आहे. या स्‍पर्धांमध्‍ये मुलं-मुली मिळुन चेसमध्‍ये 8, टेबल टेनीसमध्‍ये 8, रोप स्‍कीपिंग 8, थ्रोबॉलमध्‍ये 12, व्‍हॉलीबॉलमध्‍ये 12, कबड्डीमध्‍ये 12, खो-खो मध्‍ये 12 आणि मीनी फुटबॉल मध्‍ये 10 असे एकुण 82 खेळाडुंना व 16 तज्ञ शिक्षक, कोच, डॉक्‍टर इत्‍यादी व्‍यक्‍ती सहभागी करण्‍याचा महानगरपालिकेचा मानस आहे. सर्व खेळाडु विद्यार्थ्‍यांना मा.महापौर चेतन गावंडे, शिक्षण समिती सभापती गोपाल धर्माळे, शिक्षणाधिकारी अब्‍दुल राजीक यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

Leave A Comment