Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जिल्ह्यात12 ते 18 डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताह

अमरावतीः नागरिकांत खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी या हेतूने केंद्र शासनाकडून फिट इंडिया मुव्हमेंटचा उपक्रम राबविण्यात येतो. त्याअंतर्गत जिल्ह्यात दि. 12 ते 18 डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमात शाळा, महाविद्यालय स्तरावर क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, योगासन प्रात्यक्षिके, चित्रकला स्पर्धा, शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळा- महाविद्यालयांनी असे उपक्रम राबवून त्याची माहिती सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरीक क्षमता मूल्यमापन चाचणी घेऊन त्याची माहिती उपक्रमाच्या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲपमध्ये भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळांनी हा उपक्रम राबविण्यासाठी सहयोग द्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे

Leave A Comment