Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक लिलाधर पातुरकर व कंत्राटी शिपाई मयुर पेठे यांना श्रध्‍दांजली अर्पण

अमरावती महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक लिलाधर नामदेवराव पातुरकर, कंत्राटी शिपाई मयुर अशोकराव पेठे यांना बुधवार दिनांक 4 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता महानगरपालिकेतील प्रांगणात श्रध्‍दांजली देण्‍यात आली. यावेळी मा.महापौर चेतन गावंडे यांच्‍या हस्‍ते स्‍व.लिलाधर पातुरकर व स्‍व.मयुर पेठे यांच्‍या प्रतिमेस हारार्पण करण्‍यात आले. हारार्पणानंतर महापौर चेतन गावंडे यांनी दोन्‍ही कर्मचा-यांच्‍या आठवणींना उजाळा देवुन आपली श्रध्‍दांजली अर्पण केली. सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळुन श्रध्‍दांजली अर्पण केली. या श्रध्‍दांजली कार्यक्रमात उपमहापौर कुसुम साहु, विधी समिती उपसभापती आशिष अतकरे, नगरसेवक विजय वानखडे, नगरसेविका नुतन भुजाडे, उपआयुक्‍त विजय खोराटे, सहाय्यक आयुक्‍त अमित डेंगरे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, मनपा अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Leave A Comment