Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेकरीता अमरावतीचा संघ रवाना

अमरावती- नुकत्याच पार पडलेल्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेत अमरावतीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या विभागीय स्पर्धेत एकूण 22 स्पर्धकांनी यश संपादन केले असून त्यांची रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे दि. 3 व 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेकरीता निवड झाली आहे. खोपोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्केटिंग स्पर्धेकरीता अमरावतीचा संघ आज रवाना झाला. महत्वाचे म्हणजे यश संपादीत करणारे सर्व विद्यार्थी अमरावती डिस्ट्रीक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटिंग रोलवर सराव करतात. विभागीय स्पर्धेत एकूण 22 स्पर्धकांनी यश संपादन केले असून त्यांची नावे व खेळाचा प्रकार पुढीलप्रमाणे आहे. या शालेय खेळाडूंनी संपादीत केलेल्या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. क्वाँड्स या खेळ प्रकारात रुचिका वासनिक, मैथीली घाटे, वैदेही काकडे, मो. हुसेन, नवीन शंके, संघर्ष रौराळे, प्रथमेश पनपालिया, अथर्व काळे, जान्वही ठाकूर यांनी यश संपादक केले. तर ईनलाईन या खेळ प्रकारात फ्रँक पाटील, मंदार मोडक, वेदीका पनपालिया, कैशिकी भेलांडे, चार्मी धवने, सेजल भोकटे, तन्मय बोंडे, गोपाल वरु, ध्रुव पनपालिया, मेहुल पाटील, कनक नवघरे यांनी यश संपादन केले. वरील सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेकरीता निवड झाली असून संघ खोपोलीसाठी रवाना झाला आहे. वरील सर्व शालेय विद्यार्थी हे आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक श्याम भोकरे व स्वप्नील भोकरे तसेच असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांना, शाळेच्या शारिरीक शिक्षकांना व प्राचार्यांना आणि आपल्या आई- वडीलांना देतात. राज्यस्तीय रोलर स्केटिंग स्पर्धा दि. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान खोपोली येथे पार पडणार आहे.

Leave A Comment