Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

न्यूट्रिशनइंडिया व्हाऊचर स्कीमचा शुभारंभ

आरोग्य विभाग व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान यांच्या सहकार्याने मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी न्युट्रिशन इंडियाअंतर्गत व्हाऊचर स्कीमचा शुभारंभ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते काल बालकदिनी झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप चराटे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक चंद्रकांत झेंडे व क्षेत्र विक्री व्यवस्थापक नीळकंठ बावसकर, प्रतिक मोरे, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या प्रतिनिधी वैष्णवी कायलकर, प्लॅन इंडियाचे प्रतिनिधी राजकुमार राय व नित्यानंद हलदार, विकास सहयोग प्रतिष्ठानच्या नंदा रंगारी, सूरज पवार आदी उपस्थित होते. न्युट्रिशन इंडिया कार्यक्रमात बाळाच्या जन्मापासूनचे एक हजार दिवस बाळाची काळजी घेण्यासाठी माता व कुटुंबाचे समुपदेशन, शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासाठी पालकांना उद्युक्त करणे, स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आदी कामे होतात. व्हाऊचर स्कीमद्वारे कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार दिले जातात. त्याचप्रमाणे, अशा बालकांच्या माता व ज्यांना अतिदक्ष सुविधेची गरज आहे अशा गर्भवती महिलांना संस्थात्मक प्रसुतीसाठी प्रसूती केंद्रात क्यूआर कोडचा वापर करून दाखल करण्यात येते. तसेच, त्यांना प्रोत्साहन राशीही दिली जाते.

Leave A Comment