Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

ओल्या दुष्काळामुळे बुलडाण्यातील खामगाव तालुक्यात शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं

ओल्या दुष्काळामुळे बुलडाण्यातील खामगाव तालुक्यात शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं आहे. अतिवृष्टीने झालेल्या पिकाच्या नुकसानामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्यानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फक्त आमदार आणि नेत्यांकडून पिकांच्या नुकसानाची पाहाणी होत आहे. मात्र अद्यापही ना पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले ना मदतीचे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनं आपलं जीवन संपवलं. बोरी अडगाव येथील शेतकरी गणेश विठ्ठल मेतकर (वय५० वर्षे) या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. 4 एकरावरील पीकाचं अतोनात नुकसान झाल्यानं त्यांनी हे पाऊल उचललं आहे. तर राज्यातील शेतकरी सरकारकडे मदतीसाठी वारंवार मागणी करत आहेत. मात्र शेतकऱ्य़ांना मतद कधी मिळणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे.

Leave A Comment