Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

गाडी दिली नाही म्हणून मुलानं शाळेत स्वत:ला पेटवलं

पनवेलमध्ये हट्टानं आयुष्य संपवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलमधील घटनेत युवक गंभीर जखमी असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.कळंबोली इथल्या सुधागड कनिष्ठ महाविद्यालयात एका विद्यार्थ्यानं स्वत: ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कळंबोली इथे घडली. विद्यालयाच्या बाथरुममध्ये त्याने सकाळी स्वत:ला पेटवून घेतलं. धक्कादायक प्रकार म्हणजे वडिलांनी गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर एरोलीच्या बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.

Leave A Comment