Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे - व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. के. विसाळे

तंत्र व व्यवसाय शिक्षणाला आजच्या युगात अनन्यसाधारण महत्त्व असून विद्यार्थ्याने तंत्रकुशलता मिळवल्यास स्वयंरोजगाराचा मार्ग प्रगतीकडे नेणारा ठरतो, असे जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस. के. विसाळे यांनी नुकतेच येथे सांगितले. आयटीआय येथील एनएसएस सभागृहात अप्रेंटिसशिप पंधरवड्याच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रादेशिक सहाय्यक संचालक नरेंद्र येते, संस्थेच्या प्राचार्या श्रीमती मंगलाताई देशमुख, महावितरण कंपनीचे अभय देशपांडे, परिवहन महामंडळाचे सतीश पलेरिया, रेमंड कंपनीचे अभय पराते, मदन वाघुड, अस्पा बंड सन्सचे नितीन काळमेघ, संतोष इंगळे, टाटा मोटर्सचे संजय पाचघरे, एव्हीटीएसचे प्राचार्य विजय कुमरे, उपप्राचार्य नरेंद्र चुलेट आदींची उपस्थिती होती. आयटीआयमधील प्रत्येक प्रशिक्षणार्थी हा प्रशिक्षण घेत असताना कौशल्याम बलम या ब्रीद वाक्याचे तंतोतंत पालन करीत असतो. आपण प्राप्त केलले कौशल्य हेच आपले बळ आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात केलेच पाहिजे, असे सहाय्यक संचालक श्री. येते यावेळी म्हणाले.

Leave A Comment