Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

तीन पिढ्यांचे एकत्रित मतदान

अजनी येथील माऊंट कार्मेल शाळेतील आदर्श मतदान केंद्र 52/144 येथे आज कुरमी कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी एकत्रित मतदान केले. यामध्ये आई श्रीमती फुलवती कुरमी (वय 80 वर्षे), अंध मुलगा रघुवीर कुरमी (वय 56 वर्षे) तसेच नातू आशुतोष कुरमी (वय वर्षे 23) यांनी मतदानाचा हक्क बजावला.तसेच मोतीबाग येथील स्वस्तिक माध्यमिक विद्यालय येथे देखील आई श्रीमती देवकाबाई श्रीवास (वय वर्षे 95), मुलगी श्रीमती नर्मदा श्रीवास (वय वर्षे 65), नातू मनोज श्रीवास (वय वर्षे 44), नातसून श्रीमती गायत्री श्रीवास (वय वर्षे 32) या तीन पिढ्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

Leave A Comment