Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

22 ऑक्टोबरला अमरावती मध्ये “जलदूत – जलसंवर्धन रथ

भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो व राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठ यांच्या सहकार्याने जलशक्ती अभियानावर आधारित चित्ररथाचे उदघाट्न दि 22 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता विद्यापीठाच्या विद्यार्थी भवनाच्या प्रांगणात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मुरलीधर चांदेकर, प्र कुलगुरु डॉ राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख, आणि रासेयो चे संचालक डॉ राजेश बुरंगे आदि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. उदघाटनानंतर चित्ररथ विद्याभारती महाविद्यालय, श्री गणेशदास राठी स्कूल, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, विभागीय शासकिय ग्रंथालय, प्रा. राम मेघे इंजिनिअरिंग अँड व्यवस्थापन महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय आणि बस डेपो इत्यादी मार्गावर फिरणार आहे. पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच भारत सरकारच्या जलशक्ती अभियान चळवळीत सहभागी करुन घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील अमरावती मनपा क्षेत्र, चांदूर बाजार आणि अचलपूर या भागात जलदूत्त फिरते वाहन फिरवण्यात येणार आहे. या फिरत्या वाहनाची निर्मिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने पुणे येथील केंद्र सरकारच्या रिजनल आउटरिच ब्यूरो द्वारे करण्यात आले आहे. या चित्ररथात जलसंरक्षण, रेन वाटर हार्वेस्टिंग, पारंपारिक जलस्त्रोताचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम, घनदाट वृक्ष लागवड आणि सध्याची देशातील जलस्थिती विषयी चित्र, संदेश फलक, आडिओ-व्हिडिओ इत्यादी सुविधा ठेवण्यात आले आहे. या चित्ररथाचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी व जनतेने घ्यावे असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला आणि अंबादास यादव यांनी केले आहे.

Leave A Comment