Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

निवडणूक कर्मचाऱ्याचा ड्युटीवर असतानाच भोवळ येऊन मृत्यू

गडचिरोलीः मतदानासाठी दुर्गम ठिकाणी असलेल्या केंद्रावर साहित्य पुरवणं हे प्रशासनासमोर आव्हान असंत. त्यात जर तो गडचिरोली सारखा नक्षलग्रस्त भाग असेल तर ते आव्हान जास्तच आव्हानात्मक असतं. एटापल्ली तालुक्यात पुरसुलगोंदी येथील मतदान केंद्रावर पायी जातांना भोवळ येऊन पडल्यानंतर एका शिक्षकाचा मृत्यू झाला. बापू गावडे असं शिक्षकाचं नाव आहे. गावडे हे भोवळ येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर एटापल्लीत प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर अधिकच्या उपचारासाठी चंद्रपुरला पाठवण्यात आलं होतं. तिथ उपचार सुरु असताना आज त्यांचा मृत्यु झालाय. त्यांना मिरगीचा आजार असल्याची माहितीही दिली जातेय.

Leave A Comment