Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आज निवडणूक प्रशासन सज्ज ; प्रत्येकाने मतदान करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान उद्या दि. 21 ऑक्टोबरला 2 हजार 628 मतदान केंद्रावर होणार असून, प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राकरीता दुर्गम परिसरासह ग्रामीण भागातही मतदान पथके साहित्यासह आज रवाना करण्यात आली. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकाराचा वापर करुन 21 ऑक्टोबरला प्रत्येकाने आपल्या कुटूंब, मित्रमंडळीसह मतदान मतदान करुन लोकशाही बळकट करावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.मतदार संख्या : जिल्ह्यात 12 लाख 59 हजार 644 पुरुष मतदार, 11 लाख 89 हजार 373 स्त्री मतदार तसेच इतर 43 असे एकूण 24 लाख 49 हजार 60 मतदार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान आज दि. 21 ऑक्टोंबर रोजी होणार असून दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाचा वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असा असणार.पोलीस बंदोबस्त : निवडणूक शांतपणे व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील 2628 मतदान केंद्रावर सुमारे 12 हजार मनुष्यबळ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पाच अतिसंवेदनशील व 102 संवेदनशील बुथवर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूकीत कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून 4 हजार 334 पोलीस अधिकारी कर्मचारी, सीआयएसएफ, आरपीएसएफ, एमपीएसएपी च्या पाच कंपन्या, एसआरपीएफ च्या दोन कंपन्या, एक प्लाटून, 1344 होमगार्ड जवानांचा तगडा बंदोबस्त जिल्ह्यात करण्यात आला आहे. संपर्क यंत्रणा व सुविधा : निवडणूक निर्णय अधिका-यांपासून ते मतदान केंद्राध्यक्ष अशा विविध जबाबदा-या असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांचे वेळोवेळी प्रशिक्षणही झाले आहे. मेळघाटातील 353 मतदान केंद्राकरीता तसेच इतर केंद्राकरीता अधिकारी-कर्मचारी व पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आले आहे. तसेच मेळघाटातील मतदान केंद्राकरीता बॅटरीव्दारे प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाण्याचे कॅन व आवश्यक साहित्य सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. उर्वरित मतदारसंघातील मतदान केंद्राकरीता उद्याला (दि. 20 ऑक्टोबर) मतदान केंद्राचे कर्मचारी सकाळी रवाना होणार आहे. मेळघाटातील अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रासाठी पोलीस व वनविभागाची वायरलेस यंत्रणा आणि क्षेत्रातील 27 टॉवरच्या माध्यमातून सुरळीत मोबाईल कनेक्टीवीटी कार्यान्वित करण्यात आली आहे.कॅमेरा वेबकॉस्टींग : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या 37, बडनेरा मतदारसंघातील 33, अमरावती मतदारसंघातील 31, तिवसा मतदारसंघातील 32, दर्यापूर मतदारसंघातील 34, मेळघाट मतदारसंघातील 35, अचलपूर मतदारसंघातील 30 व मोर्शी 31 मतदारसंघाच्या मतदार केंद्र असे एकूण 263 मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कार्यालयातून लाईव्ह वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे.आदर्श, सखी, दिव्यांग मतदान केंद्र : जिल्ह्यात अकरा आदर्श मतदान केंद्र, दहा सखी मतदान केंद्र तसेच दोन दिव्यांग मतदान केद्र उभारण्यात आली आहेत. पर्यावरण स्नेही मतदान केंद्र या संकल्पनेचा अवलंब करुन सर्व मतदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले आहे.सर्व्हीस व्होटर्स : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रासाठी 4 हजार 324 बॅलेट युनिट, 3 हजार 168 कंट्रोल युनिट व 3 हजार 603 व्हीव्हीपॅट मशीन याप्रमाणे इव्हीएम यंत्रणा संबंधित मतदान केंद्रासाठी राहणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 282 सर्व्हीस मतदारांना ईटीपीबीएस बॅलेट पेपर वितरीत करण्यात आले आहे. दिव्यांग मतदार व त्यांच्यासाठी सुविधा : जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघात 9 हजार 265 दिव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी संबंधित मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या सहाय्याकरीता 2 हजार 628 स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिव्यांग मतदारांसाठी सुमारे 1 हजार 880 व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था सुध्दा प्रशासनाव्दारे करण्यात आली आहे. एफएसटी, एसएसटी पथक : आयोगाच्या निर्देशानुसार आज दि. 19 ऑक्टोंबरच्या सायंकाळपासून निवडणुक प्रचार व सभांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच निवडणूक विभागाव्दारे स्थापित फ्लाईंग स्कॉड टिम व स्टॅटीक सर्व्हीलन्स टीम यांच्याकडून शेवटच्या 48 तासात बारीक नजर राहणार असून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.1950 टोल फ्री क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत ‘1950’ क्रमांकाचा टोल-फ्री दूरध्वनी

Leave A Comment