Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मूर्तिजापूर शहरात अवैध देशी -विदेशी दारूचा साठा जप्त… पोलीस अधीक्षक विशेष पथकाची कारवाई

मुर्तीजापुर प्रतिनिधी:-विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच मूर्तिजापूर शहरात देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे मुर्तीजापुर शहरातील जुनी बस्ती, कारंजा अकोला बायपास, स्टेशन विभागातील काही भागात मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारुचा काळाबाजार होऊन सर्रासपणे विक्री सुरू असल्याचे पोलीस अधिक्षक विशेष पथकास गुप्त माहिती मिळाल्या नुसार जूनिवस्ती विभागातील मलाईपुरा भागात राहणारे हे दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली असता अकोला पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर सह कर्मचाऱ्यांनी धाड टाकून देशी विदेशी दारू जप्त केली आहे .या कारवाईत अंदाजे सुमारे एक लाख बासष्ट हजाराच्या वर मुद्देमाल जप्त केला आहे तर आरोपी याच्यावर मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave A Comment