Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जिल्ह्यातनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी शैलेश नवाल यांनी विविध प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात धामनगाव रेल्वे, बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर व मोर्शी या आठही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने मतदान पथके आज व 20 ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहेत. निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रावर व आसपासच्या परिसरामध्ये मतदारांची व नागरिकांची गर्दी होवू शकते. त्यामुळे मतदान कामकाजामध्ये व्यत्यय निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सदर कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी शैलेश नवाल यांनी पथके रवाना होणाऱ्या दिवशी दि. 19 व 20 ऑक्टोंबरला तसेच मतदानाच्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रावर गैरप्रकार करतांना किंवा मतदान केंद्राजवळ प्रचार करतांना आढळून आल्यास तसेच केंद्रामध्ये येणाऱ्या मतदारांना प्रलोभन किंवा गैरशिस्त वर्णन आढळून आल्यास सदर व्यक्ती विरुध्द लोक प्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 128 ते 134 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.मतदान संपण्याच्या 48 तासांपूर्वी अर्थात दि. 19 ऑक्टोबरच्या सायंकाळी सहा वाजतापासून दि. 21 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत (रात्री 12 पर्यंत) उमेदवार वगळता मतदारसंघाच्या बाहेरील सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणा-या सर्व व्यक्ती व स्टार प्रचारक यांना जिल्ह्याच्या सीमेत राहण्यास मनाई करण्यात येत आहे. शेवटच्या 48 तासांत ध्वनीक्षेपणावर संपूर्णत: बंदी राहील. तसेच, मतदान केंद्रापासून 200 मीटरवर त्रिज्येच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी जागेत ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक वापरास, प्रचार करण्यास बंदी राहील. या कालावधीत अनधिकृतपणे वाहनातून मतदारांची ने-आण करणे, मतदान केंद्र परिसरात वाहन आणणे, राजकीय नेत्यांची छायाचित्रे, चिन्हे लावणे, घोषणा, जाहीररीत्या ओरडणे यावर बंदी राहील.

Leave A Comment