Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा सर्वोच्च आणि पवित्र अधिकार प्रदान केला आहे. राज्यात सर्वत्र 21 ऑक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार असून त्यादिवशी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले.यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, माध्यम सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी हर्षवर्धन पवार, नायब तहसीलदार (निवडणूक) श्याम देशमुख, मुद्रित व इलेक्ट्रानिक्स माध्यमांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.श्री नवाल म्हणाले की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोंबर रोजी होणार असून दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाचा वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असा असणार. याअनुषंगाने प्रशासनाव्दारे संपूर्ण तयारी केली असून जिल्ह्याच्या आठही मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रावर सुमारे 12 हजार मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मेळघाटातील 353 मतदान केंद्राकरीता आज तेथील केंद्राचे कर्मचारी व पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आले आहे. तसेच मेळघाटातील मतदान केंद्राकरीता बॅटरीव्दारे प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाण्याचे कॅन व आवश्यक साहित्य सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. उर्वरित मतदारसंघातील मतदान केंद्राकरीता उद्याला (दि. 20 ऑक्टोबर) मतदान केंद्राचे कर्मचारी सकाळी रवाना होणार आहे. मेळघाटातील अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रासाठी पोलीस व वनविभागाची वायरलेस यंत्रणा आणि क्षेत्रातील 27 टॉवरच्या माध्यमातून सुरळीत मोबाईल कनेक्टीवीटी कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या 37, बडनेरा मतदारसंघातील 33, अमरावती मतदारसंघातील 31, तिवसा मतदारसंघातील 32, दर्यापूर मतदारसंघातील 34, मेळघाट मतदारसंघातील 35, अचलपूर मतदारसंघातील 30 व मोर्शी 31 मतदारसंघाच्या मतदार केंद्र असे एकूण 263 मतदान केंद्रावर वेबकॉस्टींग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अकरा आदर्श मतदान केंद्र, दहा सखी मतदान केंद्र तसेच दोन दिव्यांग मतदान केद्र उभारण्यात आली आहेत. पर्यावरण स्नेही मतदान केंद्र या संकल्पनेचा अवलंब करुन सर्व मतदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रासाठी 4 हजार 324 बॅलेट युनिट, 3 हजार 168 कंट्रोल युनिट व 3 हजार 603 व्हीव्हीपॅट मशीन याप्रमाणे इव्हीएम यंत्रणा संबंधित मतदान केंद्रासाठी राहणार आहे.जिल्ह्यातील 3 हजार 282 सर्व्हीस मतदारांना ईटीपीबीएस बॅलेट पेपर वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघात 9 हजार 265 दिव्यांग मतदार असून त्यांच्यासाठी संबंधित मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या सहाय्याकरीता 2 हजार 628 स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिव्यांग मतदारांसाठी सुमारे 1 हजार 880 व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था सुध्दा प्रशासनाव्दारे करण्यात आली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार आज दि. 19 ऑक्टोंबरला सायंकाळी 5 नंतर निवडणुकीचा प्रचार व सभांना पूर्णपणे बंदी राहणार आहे. तसेच निवडणूक विभागाव्दारे स्थापित फ्लाईंग स्कॉड टिम व स्टॅटीक सर्व्हीलन्स टीम यांच्याकडून शेवटच्या 48 तासात बारीक नजर राहणार असून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत ‘1950’ क्रमांकाचा टोल-फ्री दूरध्वनी सुरू करण्यात आला आहे. हा टोल फ्री क्रमांक 24 तास कार्यान्वित राहणार असून मतदार यादीतील नाव शोधणे, निवडणुकीविषयक नागरिकांच्या अडचणी, मतदार यादीची माहिती, मतदारांच्या तक्रारींची दखल या माध्यमातून घेण्यात येणार असून तक्रारींचे तत्काळ निवारण सुध्दा करण्यात येणार आहे. ज्या मतदारांकडे मतदानाचे व्होटर आयडी कार्ड नसेल त्यांना आयोगाच्या सूचनेनुसार अकरा ओळखपत्र मतदानाच्या दिवशी ओळखपत्राचा पुरावा म्हणून दाखवून मतदान करता येईल. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाही मजबुत करण्यासाठी मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात अधिकाधिक संख्येने कुटूंबासह सहभाग घेऊन मतदान हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.

Leave A Comment