Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

डॉ.सूनील देशमुख यांचा प्रहार गाडगेनगरासह, अर्जून नगर परिसरात विराट प्रचार सभा

एकेकाळी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात दिवसभर बसून राहणाऱ्या ज्या नेत्याला आमदार बनविल्यानंतर ते त्यांच्या मतदारसंघाचा विकास करू शकले नाहीत ते आता विरोधात बसून शहराचा विकास करू शकतील का ? दोन मतदारसंघात नशीब आजमावल्यानंतर सत्तेसाठी अमरावती मतदारसंघात नशीब आजमावलया निघाले असून विकासाची व्याख्या तरी त्यांना ठाऊक आहे का ? असा घणाघात डॉ.सूनील देशमुख यांनी केला. शुक्रवारी रात्री गाडगेनगर परिसरात पार पडलेल्या सभेला संबोधित करताना डॉ.सूनील देशमुखांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.गाडगेनगरसह, अजूर्न नगर परिसरात डॉ.सूनील देशमुख यांच्या प्रचारार्थ जंगी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते मधुसुदन उमेकर, बाळासाहेब भूयार, चंदू बोमरे, गटनेता सूनील काळे, प्रकाश बनसोड, मिलिंद चिमोटे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.सूनील देशमुख म्हणाले की, स्वत: आमदार असताना मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर पंचवटी ते नवसारी या भागात आमदारकीच्या शेवटच्या 3 वर्षामध्ये रूपयाचा देखील निधी अमरावती शहरात खर्च केला नाही. त्यांच्या मतदारसंघात देखील तिथल्या मतदारांनी दोन वेळा त्यांचा दारूण पराभव केला. तसेच पदवीधर मतदारसंघात देखील याच कुटूंबाला विक्रमी मतांनी मतदारांनी बाजूला सारले. अशा अवस्थेत शेवटचे नशीब आजमवण्यासाठी त्यांनी आता अमरावती मतदारसंघ निवडला असून या शहरातला सुज्ञ मतदार विकासाला मतदान करणार की, जाती-पातीचे फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना निवडून देणार ? याचा विचार मतदारांना करायचा आहे असे डॉ.देशमुख यांनी आपल्या भाषणातून सांगितले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत दमदाटी करून शिक्षकांना आपल्याला मतदान करणारे लोक तुम्हीच बघितले आणि ऑडीओ क्लिपमधून ऐकले देखील. अशा प्रवृत्तीच्या लोकांना अमरावती शहरातील मतदार मतदान करणार नाही याची मला शाश्वती आहे. गेल्या २० वर्षांच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर कुठलेही चुकीचे आरोप झाले नाही किंवा कधीही फोडाफोडीचे राजकारण मी केले नाही. केवळ विकासाच्या मुद्दयांवरच मी आजवर निवडणूक लढवत आलो आणि आजही तो मुद्दा घेऊन मी तुमच्यासमोर आशिर्वाद मागण्यासाठी उभा आहे असे डॉ.देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले. शहराच्या भविष्यासाठी पुरेपुर विचार करूनच मतदान करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी दोन्ही ठिकाणी पार पडलेल्या सभांना मतदारांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी महायुतीच्या विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.

Leave A Comment