Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

राष्ट्रसंतांच्या भूमीत लोकशाहीचा जागर

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांना मतदानाचे आवाहन करणारा जागृतीपर कार्यक्रम आज गुरुकुंज मोझरी येथे घेण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या गुरुकुंज मोझरी येथे आज लोकशाहीचा जागर झाला. स्वीप मोहिमेत सदिच्छा दूत बबिता ताडे यांनी यावेळी मंदिराच्या परिसरात उपस्थित भाविक व परिसरातील नागरिकांना मतदान प्रक्रिया, अपंगांसाठीचे ॲप, महिलांसाठीच्या सुविधा आदींची माहिती दिली व मतदानाचे आवाहन केले. तिवसा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडून मतदार चिठ्ठीवाटप केले गेले. त्यात काही ठिकाणी मतदानाची वेळ चुकून रात्री 12 अशी झाली होती. मात्र ही तांत्रिक चूक लक्षात येताच वाटप थांबवून तत्काळ दुरुस्ती करून सुधारित मतदार चिठ्ठ्या त्या भागात वितरीत करण्यात येत आहे. संबंधित यादीतील सर्व 13 हजार 399 मतदारांना सुधारित पुर्नमुद्रीत मतदार चिठ्ठयांचे तत्काळ वितरण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत करण्याची कार्यवाही होत आहे. तसेच, संबंधित परिसरात ध्वनिक्षेपणाद्वारे घोषणा व दवंडी देऊन, तसेच फलकांद्वारेही मतदानाचा दिवस, मतदानाच्या वेळा याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. मतदारांमध्ये वेळेसंबंधी कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी विविध माध्यमे व समाजमाध्यमाव्दारे व्यापक प्रसिध्दी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याव्दारे करण्यात येत आहे.

Leave A Comment