Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

1 सप्टेंबरपासून बदलत आहेत आयकर संबंधीत हे नियम

दरवर्षी बजेटनंतर एप्रिल महिन्यात आयकरचे नियम बदलत असतात. मात्र यंदा बजेट जुलै महिन्यात सादर झाल्याने काही नियम हे 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. हे नियम टीडीएस, पॅनकार्ड आणि आधारकार्डाशी संबंधीत असल्याने सामान्य लोकांवर याचा परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात हे नियम काय आहेत. घर खरेदीवर टीडीएस – एक सप्टेंबरपासून तुम्हाला घर खरेदीवर टीडीएस द्यावा लागणार आहे. यामध्ये क्लब सदस्य फी, कार पार्किंग फी, वीजेचे कनेक्शन, पाणीचे कनेक्शन या सेवांचा समावेश आहे. 50 लाखांपेक्षा अधिक प्रॉपर्टी खरेदी केल्यावर आधीप्रमाणेच एक टक्के टीडीएस द्यावा लागेल. बँक खात्यातून पैस काढल्यास टीडीएस – जर एखादी व्यक्ती एक आर्थिक वर्षात 1 करोड पेक्षा अधिक रक्कम बँक, पोस्ट ऑफिस अथवा को-ऑपरेटिव बँक खात्यातून काढत असेल तर त्याला दोन टक्के टीडीएस द्यावा लागेल. यासाठी आयकर कायद्यात सेक्शन 194 एन आणण्यात आले आहे. 50 लाखांपेक्षा अधिक देय – जर एखादी व्यक्ती या एचयुएफ कोणत्या ठेकेदार अथवा प्रोफेशनल व्यक्तीला एक वर्षात एखाद्या सेवेसाठी 50 लाख रूपये देते तर त्याला 5 टक्के टीडीएस भरावा लागेल. जीवन विमा पॉलिसी – जीवन विमा पॉलिसी घेणाऱ्यांना पॉलिसीची मॅच्युरिटी झाल्यावर जर कोणताही टॅक्स द्यावा लागत असेल तर अशा रक्कमेवर 5 टक्के टीडीएस द्यावा लागेल. सध्या 10 टक्के प्रिमियम असणाऱ्या पॉलिसीवर कोणत्याही प्रकारचा कर नाही. 50 हजारांपेक्षा कमीचे बँकिंग ट्रांजेक्शन – आधी 50 हजार रूपये अथवा त्यापेक्षा अधिकच्या बँकिंग ट्रांजेक्शनची माहिती सरकारला द्यावी लागत असे. मात्र आता बँकिंग आणि आर्थिक संस्थांनी माहिती मागितल्यावर त्यापेक्षा कमी व्यवहारांचीही माहिती द्यावी लागेल. पॅनकार्ड आणि आधारमध्ये बदल – पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास ते रद्द करण्यात येणार आहे. लोक पॅनकार्डचा वापर करू शकणार नाहीत. त्याचबरोबर आयटीआर भरणे देखील अवघड होईल. तसेच, कोणत्याही व्यवहारासाठी पॅन कार्ड नसेल तर आधार कार्डचा वापर करता येणार आहे.

Leave A Comment