Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

लष्कराने प्रोटोकॉल तोडून 8 वर्षीय मुलाचा मृतदेह पाकिस्तानला सोपवला

सीमारेषेवर पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघण करत असतानाही हिंदुस्थानी लष्कराने माणुसकी दाखवत सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून 8 वर्षीय मुलाचा मृतदेह पाकिस्तानला सोपवला आहे. हा मुलगा पीओकेमधून गायब झाला होता.मृत मुलाचे नाव आबिद शेख असे आहे. पीओकेमधून गायब झालेल्या या मुलाचा मृतदेह जम्मू-कश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यातील किशनगंगा नदीमध्ये सापडला होता. अचूरा गावातील स्थानिक लोकांना हा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी लष्कराला याची माहिती दिली. जवानांनी मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्याच्या पेहरावावरून तो पाकिस्तानमधील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले.लष्कराने हॉटलाईनच्या आधारे याची माहिती पाकिस्तानला दिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाचा मृतदेह परत पाकिस्तानला पाठवण्याची विनंती केली. यानंतर माणुसकी दाखवत तात्काळ कारवाई करत लष्कराने मुलाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली केला. प्रोटोकॉल तोडून माणुसकीचे उदाहरण दाखवून देणाऱ्या लष्काराचे मुलाच्या कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.

Leave A Comment