Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अमरावती महानगरपालिका, आयुक्‍त संजय निपाणे यांनी केली विविध विभागांची पाहणी

11 जुलै,2019 रोजी सकाळी 11.00 वाजता मनपा आयुक्‍त संजय निपाणे, उपआयुक्‍त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, संगणक कक्ष प्रमुख अमित डेंगरे यांनी महानगरपालिकेतील विविध विभागांची पाहणी केली.यामध्‍ये सामान्‍य प्रशासन विभाग, संगणक विभाग, जनसंपर्क विभाग, ऑटो डी.सी.आर., लेखा विभाग, आरोग्‍य विभाग, पशुशल्‍य चिकीत्‍सक विभाग, स्‍वच्‍छता विभाग, विधी विभाग, इत्‍यादी विभागांची पाहणी करण्‍यात आली. यावेळी मनपा आयुक्‍तांनी सुचना दिल्‍या की जुने कागद पत्रांची वर्गवारी करुन शासन निर्णया प्रमाणे कार्यवाही करावी. अस्‍ताव्‍यस्‍त असणारे साहित्‍य व्‍यवस्थित करुन लावावे. कपाटे स्‍वच्‍छ करण्‍यात यावी. काही विभागाला त्‍वरीत सुधारणा करण्‍याच्‍या सुचना यावेळी मनपा आयुक्‍त संजय निपाणे यांनी दिल्‍या. अधिनस्‍त कर्मचा-यांचा कामाचा आढावा प्रत्‍येक विभागप्रमुखाने घेण्‍याच्‍या सुचना यावेळी देण्‍यात आल्‍या. ज्‍या कर्मचा-याकडे कमी काम असतील त्‍यांची ज्‍या विभागात कर्मचा-यांची मागणी असेल त्‍या विभागात त्‍याची पदस्‍थापना करण्‍याचे निर्देश दिले.

Leave A Comment