Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अनैतिक प्रेम संबंधातून विवाहिता व प्रेमीने शेतात घेतला गळफास

अचलपूर तहसील मधील हनुमंतखेडा गावातील अनैतिक प्रेम संबंधातील दोघांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहित असलेली महिलेचे गावाशेजारी असेलेल्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. २६ फेब्रुवारीला दोघेही पळून गेले होते. सरिताला १ मुलगा व १ मुलगी असूनसुद्धा तिने कुठलाही विचार न करता अमोलसोबत पलायन केले. घरातील २ लाख व सोन्याचे दागिने घेऊन ती गेली होती. प्रेमी अमोलसोबत पलायन केले त्याची परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रारही दिली होती. मात्र ९ जुलैला दोघेही शेतातील झाडाला गळफास घेतल्याचे नागरिकांना आढळून आले. त्यांच्या बाजूला विषारी कीटकनाशक बॉटल आढळून आली. याच ठिकाणी मोबाइल, कपडे बॅग दिसून आली. दोघांची हत्या की आत्महत्या यावर संपूर्ण गावात चर्चा सुरु आहे. पोलीस सखोल चौकशी करीत आहे.

Leave A Comment