Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, कृषी मंत्री अनिल बोंडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिक्षण मंत्री आशिष शेलार, कामगार मंत्री संजय कुटे, पदुम मंत्री महादेव जानकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पणन व वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे, रोहयो, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, पर्यावरण राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, गृहनिर्माण राज्य मंत्री रवींद्र वायकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, यांनीही गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दोन्ही विधिमंडळातील सदस्य तसेच विधानभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ००००

Leave A Comment