Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

अमरावती महानगरपालिका सभापतीपदी इंदुताई सावरकर, अजय सारसकर, गोपाल धर्माळे, वंदनाताई हरणे व उपसभापतीपदी आशिष अतकरे, संजय वानरे, पंचफुला चव्‍हाण, सुनंदाताई खरड विराजमान

अमरावती महानगरपालिका अंतर्गत समितीच्‍या नवनिर्वाचित विधी समिती सभापतीपदी इंदुताई सावरकर व उपसभापतीपदी आशिष अतकरे, शहर सुधार समिती सभापतीपदी अजय सारसकर व उपसभापतीपदी संजय वानरे, माध्‍यमिक पुर्व माध्‍यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापतीपदी गोपाल धर्माळे व उपसभापतीपदी पंचफुला चव्‍हाण, महिला व बाल कल्‍याण समिती सभापतीपदी वंदनाताई हरणे व उपसभापतीपदी सुनंदाताई खरड यांनी आज दिनांक 25 जुन,2019 रोजी पदाचा पदभार मावळत्‍या सभापती व उपसभापती यांचेकडुन स्विकारला. सदर पदग्रहण समारंभाकरिता सभागृह नेता सुनिल काळे, भाजपा शहर अध्‍यक्ष जयंत डेहनकर, किरण पातुरकर, रवी खांडेकर, झोन सभापती प्रमिला जाधव, सोनाली नाईक, गंगाताई अंभोरे, नगरसेवक मिलींद चिमोटे, तुषार भारतीय, वि‍वेक कलोती, डॉ. प्रणय कुळकर्णी, बलदेव बजाज, विजय वानखडे, राजेश साहु, श्रीचंद तेजवानी, नगरसेविका लविना हर्षे, पद्मजा कौंडण्‍य, वंदना मडघे, निता राऊत, स्‍वाती जावरे, जयश्री कु-हेकर, स्‍वाती कुळकर्णी, नुतन भुजाडे, जयश्री डहाके, सोनाली करेसिया, शोभा शिंदे, रिता पडोळे, रिता मोकलकर, सतिश करेसिया, शिक्षणाधिकारी अनिल कोल्‍हे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, लखन राज, विशाल कुळकर्णी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पदग्रहण समारंभात सभागृह नेता सुनिल काळे, भाजपा शहर अध्‍यक्ष जयंत डेहनकर, किरण पातुरकर, रवी खांडेकर, नगरसेवक मिलींद चिमोटे, तुषार भारतीय यांनी नवनिर्वाचित विधी समिती सभापतीपदी इंदुताई सावरकर व उपसभापतीपदी आशिष अतकरे, शहर सुधार समिती सभापतीपदी अजय सारसकर व उपसभापतीपदी संजय वानरे, माध्‍यमिक पुर्व माध्‍यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापतीपदी गोपाल धर्माळे व उपसभापतीपदी पंचफुला चव्‍हाण, महिला व बाल कल्‍याण समिती सभापतीपदी वंदनाताई हरणे व उपसभापतीपदी सुनंदाताई खरड यांना शुभेच्‍छा देऊन समिती अंतर्गत कामास गती व सुधारणा करण्‍याच्‍या कामास सहकार्य करण्‍याचे आश्‍वासन दिले.यावेळी सर्व सभापती यांनी त्‍यांना दिलेल्‍या कार्यास योग्‍य न्‍याय देण्‍यात येईल व दिलेली जबाबदारी यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यात येईल.

Leave A Comment