Site Logo
ब्रेकिंग न्यूज़

मुथूट फायनान्स दरोडा: सू्त्रधार अटकेत

मुथूट फायनान्सच्या कार्यालयात पडलेल्या सशस्त्र दरोडाप्रकरणी एका आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी १० दिवसांच्या आत ही कारवाई केली आहे. या कारवाईत जितेंद्र विजय बहादूर सिंह या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.या दरोड्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ६ जणांनी तुरुंगातच मुथूट फायनान्स कार्यालयातील या दरोड्याचा कट रचला. पैकी सूत्रधारास अटक झाली असून इतर ५ आरोपी फरार झाले आहेत. सहा आरोपींपैक एक संशयित आरोपी आहे. तो पश्चिम बंगालमधील एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. या आरोपींपैकी ३ आरोपींची रामपूर येथे, तर इतर ३ आरोपी सुरतमध्ये भेट झाली. या आरोपींनी नाशिकमध्ये ५ ते ६ वेळा रेकी केली. मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोड्यादरम्यान, परमिंदर सिंह याने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, फरार आरोपींना पाताळातून शोधून काढू असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Comment